RBI Governor Sanjay Malhotra :भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा दावा भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी शनिवारी केला. देशाच्या विकासाचे श्रेय त्यांनी पंतप्रधान जन धन योजनेला दिले. अमेरिकेने देशावर लादलेल्या टॅरिफच्या परिस्थितीतही देशाचा जीडीपी चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत ७.८ टक्क्यांनी वाढला आहे. या पार्श्वभूमीवर मल्होत्रा बोलत होते.
११ वर्षांपूर्वी झाली होती योजनेची सुरुवात
इंदूरच्या रंगवासा गावात एका सरकारी बँकेच्या आर्थिक समावेशन अभियानाला संबोधित करताना संजय मल्होत्रा म्हणाले की, केंद्र सरकार आणि आरबीआयने ११ वर्षांपूर्वी बँकांच्या सहकार्याने जन धन योजना सुरू केली होती, ज्यामुळे संपूर्ण देशाचा विकास झाला आहे. ते पुढे म्हणाले, “आज भारत जगातील ५ सर्वात विकसित देशांमध्ये गणला जातो आणि लवकरच देश तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.” आरबीआय गव्हर्नर यांनी सांगितले की, देशाच्या प्रगतीच्या या प्रवासात सर्व वर्गातील लोकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी या योजनेअंतर्गत ५५ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत, ज्यातून त्यांना बचत, पेन्शन, विमा, कर्ज आणि इतर सेवा दिल्या जात आहेत. यावेळी भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष सी.एस. सेट्टी हे देखील उपस्थित होते.
From financial exclusion to empowerment! Here is a glimpse of how PM Jan Dhan Yojana has transformed lives across India. #11YearsOfJanDhanhttps://t.co/z0VXPo0e3r
— Narendra Modi (@narendramodi) August 28, 2025
अलीकडेच पंतप्रधान जन धन योजनेला ११ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते की, या योजनेने लोकांना स्वतःचे भविष्य लिहिण्याचे सामर्थ्य दिले आहे.
वाचा - फक्त १ लाख रुपये जमा करून मिळवा १४,३२५ रुपये निश्चित व्याज! कॅनरा बँकेने आणखी खास FD योजना
काय आहे जन धन योजना?
या योजनेचा मुख्य उद्देश गरिबांचे बँक खाते उघडून त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे आहे. या खात्यांमध्ये किमान शिल्लक ठेवण्याची कोणतीही अट नाही. तसेच, यामध्ये ओव्हरड्राफ्टची सुविधाही मिळते. या योजनेअंतर्गत खातेधारकांना विमा देखील दिला जातो. कोणत्याही कारणामुळे खातेधारकाचा मृत्यू झाल्यास, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नॉमिनीचा लाभ मिळतो. या योजनेअंतर्गत खाते उघडण्यासाठी तुम्हाला बँकेत जाऊन अर्ज भरावा लागेल.