Ratnamani Metals and Tubes Stock: रत्नमणी मेटल्स अँड ट्यूब्स लिमिटेड ही गेल्या ५ वर्षांत गुंतवणूकदारांना आश्चर्यचकित करणारी कंपनी आहे. २०२० पासून कंपनीच्या शेअरच्या किंमतीत जवळपास ३००% वाढ झाली आहे. म्हणजे जर कोणी ५ वर्षांपूर्वी त्यात पैसे गुंतवले असते तर आज त्याचे पैसे चौपट झाले असते. त्यामुळे त्याला 'मल्टीबॅगर स्टॉक' असं म्हणतात.
मात्र, अलीकडच्या काळात त्याच्या शेअरच्या किमतीत काही चढ-उतार झाले आहेत. २४ जून २०२५ रोजी शेअरची किंमत सुमारे २,७६० रुपये होती, जी मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे २४% कमी आहे. याचं कारण बाजारातील काही आव्हानं किंवा गुंतवणूकदारांकडून नफा वसूलीदेखील असू शकतं.
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
प्रति शेअर १४ रुपये लाभांश
आता आपण लाभांशाबद्दल बोलूया. कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना खूश करण्यासाठी नुकतीच मोठी घोषणा केली आहे. १६ मे २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रत्येक शेअरवर १४ रुपये लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. म्हणजेच एखाद्याकडे १०० शेअर्स असतील तर त्याला १४०० रुपये मिळतील. या लाभांशाची रेकॉर्ड डेट २ सप्टेंबर २०२५ ठेवण्यात आली आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांकडे त्या दिवशी हे शेअर्स असतील त्यांनाच ही रक्कम मिळणार आहे. लक्षात ठेवा, हल्ली शेअर बाजारात टी+१ सेटलमेंटचा नियम आहे, म्हणजेच शेअर्स खरेदी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी शेअर्स तुमच्या खात्यात येतात. त्यामुळे डिव्हिडंड मिळवायचा असेल तर १ सप्टेंबर २०२५ पूर्वी शेअर्स खरेदी खात्यात असणं आवश्यक आहे.
कर्ज अतिशय कमी
कंपनीच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर ती खूप मजबूत आहे. कंपनीचं बाजार भांडवल १९,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. २०२४-२५ मध्ये कंपनीला ५,१८६ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत नफ्यात किंचित घट झाली असली तरी कंपनीवरील कर्ज खूपच कमी आहे, ही चांगली बाब आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आले आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)