Lokmat Money > बिझनेस न्यूज > Ratan Tata Will: कोण आहे मोहिनी, ज्यांना रतन टाटांनी ५०० कोटी दिले; मृत्युपत्रात उल्लेखाने सगळेच शॉक

Ratan Tata Will: कोण आहे मोहिनी, ज्यांना रतन टाटांनी ५०० कोटी दिले; मृत्युपत्रात उल्लेखाने सगळेच शॉक

दत्ता यांना डिसेंबर २०२४ मध्ये मुंबईच्या NCPA इथं आयोजित रतन टाटा यांच्या जयंतीदिवशी झालेल्या कार्यक्रमाला निमंत्रित केले होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 09:56 IST2025-02-07T09:55:31+5:302025-02-07T09:56:30+5:30

दत्ता यांना डिसेंबर २०२४ मध्ये मुंबईच्या NCPA इथं आयोजित रतन टाटा यांच्या जयंतीदिवशी झालेल्या कार्यक्रमाला निमंत्रित केले होते

Ratan Tata Will: Who is Mohini Mohan Dutta, to whom Ratan Tata gave 500 crores; Everyone is shocked by the mention in the will | Ratan Tata Will: कोण आहे मोहिनी, ज्यांना रतन टाटांनी ५०० कोटी दिले; मृत्युपत्रात उल्लेखाने सगळेच शॉक

Ratan Tata Will: कोण आहे मोहिनी, ज्यांना रतन टाटांनी ५०० कोटी दिले; मृत्युपत्रात उल्लेखाने सगळेच शॉक

नवी दिल्ली - दिवंगत रतन टाटा यांच्या नुकत्याच उघडलेल्या मृत्युपत्रात एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. टाटा यांनी त्यांच्या संपत्तीमधील एक तृतियांश हिस्सा म्हणजे जवळपास ५०० कोटी हून अधिक संपत्ती अशा व्यक्तीला देऊन गेलेत, ज्यांच्याबाबत खूप कमी लोकांनाच माहिती आहे. रतन टाटा यांनी त्यांच्या मृत्युपत्रात मोहिनी मोहन दत्ता यांना ५०० कोटीहून अधिक संपत्ती दिली आहे. रतन टाटा आणि दत्ता यांच्या संबंधांबाबत फार कुणाला माहिती नाही. मृत्युपत्रात मोहिनी मोहन दत्ता यांच्या नावाचा उल्लेख होणे टाटा कुटुंबालाही धक्का देणारं आहे.

कोण आहेत मोहिनी मोहन दत्ता?

मोहिनी मोहन दत्ता हे जमशेदरपूरमध्ये राहत असून ते ट्रॅव्हल सेक्टरमध्ये काम करतात. त्यांना इतकी मोठी रक्कम मिळणं एखाद्या फिल्मी कहाणीहून कमी नाही. दत्ता यांचं कुटुंब Stallion नावाची एक ट्रॅव्हल एजेंसी चालवत होते. २०१३ साली त्याचं ताज सर्व्हिसेसमधून विलीनीकरण झाले. ताज सर्व्हिस ही ताज ग्रुप ऑफ हॉटेल्सचा भाग आहे. स्टॅलियनमध्ये दत्ता कुटुंबाची ८० टक्के भागीदारी तर २० टक्के भागीदारी टाटा इंडस्ट्रीकडे होती. मोहिनी दत्ता टीसी ट्रॅव्हल सर्व्हिसच्या संचालकही आहेत. थॉमस कुक यांच्याशी निगडीत ही कंपनी आहे. 

रतन टाटा यांच्या निकटवर्तियांच्या माहितीनुसार, दत्ता त्यांचे जुने सहकारी होते, कुटुंबासह रतन टाटा यांच्या जवळचे लोक दत्ता कुटुंबाला ओळखतात. रतन टाटा यांच्या मृत्युपत्रात त्यांची सावत्र बहीण शिरीन आणि डीना जेजीभॉय यांचाही उल्लेख आहे. डेरियस खंबाटा यांनीही मोहिनी दत्ता यांच्यावर बोलण्यास नकार दिला. दत्ता यांच्या २ मुलींपैकी एकीने २०२४ पर्यंत ९ वर्ष टाटा ट्रस्टमध्ये काम केले. त्याआधी ती ताज हॉटेलमध्ये काम करायची. दत्ता कुटुंब टाटा कुटुंबाच्या जवळचे होते. ऑक्टोबर २०२४ मध्ये रतन टाटा यांच्यावरील अंत्यसंस्काराच्या दिवशी मीडियात दत्ता यांची बातमी आली होती. ते रतन टाटा यांना पहिल्यांदा जमशेदपूरच्या डिलर्स हॉटेलला भेटले होते. तेव्हा रतन टाटा २४ वर्षांचे होते. त्यांनी माझी मदत केली आणि मला पुढे आणले. गेली ६० वर्ष आम्ही एकमेकांना ओळखत होतो असं दत्ता यांनी सांगितले.

टाटा यांचं मृत्यूपत्र

दत्ता यांना डिसेंबर २०२४ मध्ये मुंबईच्या NCPA इथं आयोजित रतन टाटा यांच्या जयंतीदिवशी झालेल्या कार्यक्रमाला निमंत्रित केले होते. रतन टाटा यांनी त्यांची बरीच संपत्ती दान म्हणून सोडली आहे. त्याशिवाय मृत्युपत्रात सावत्र बहिणीसाठीही काही मालमत्ता सोडली आहे. सध्या कायदेशीर तज्ज्ञांकडून टाटा यांच्या संपत्तीचं वाटप बारकाईने तपासले जात आहे. रतन टाटा यांनी अखेरच्या काळात त्यांच्या संपत्तीचा मोठा वाटा रतन टाटा एंडोमेंट फाऊंडेशन आणि रतन टाटा एंडोमेंट ट्रस्ट या २ संस्थांना दिला होता. रतन टाटा यांच्याकडे फेरारी आणि मसेराती सारख्या अनेक आलिशान गाड्या, महागड्या पेंटिंग्ज, स्टार्टअप्समधील शेअर्स आणि इतर गुंतवणूक होती. २०२३ पर्यंत रतन टाटांच्या वैयक्तिक गुंतवणूक वाहन आरएनटी असोसिएट्समध्ये १८६ कोटी रुपयांची गुंतवणूक होती. त्याचे सध्याचे बाजार मूल्य अनेक पटींनी वाढले असेल. रतन टाटा यांच्या मालमत्तेचं वाटप केवळ मृत्युपत्र प्रोबेटसाठी सादर केल्यानंतर आणि उच्च न्यायालयाने प्रमाणित केल्यानंतरच करता येईल. या प्रक्रियेला ६ महिने लागू शकतात असं कायदेशीर तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 

Web Title: Ratan Tata Will: Who is Mohini Mohan Dutta, to whom Ratan Tata gave 500 crores; Everyone is shocked by the mention in the will

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.