Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'या' पठ्ठ्याने वर्षभरात कंडोमवर उडवले १ लाख रुपये; इन्स्टामार्टच्या अहवालातून धक्कादायक आकडेवारी उघड

'या' पठ्ठ्याने वर्षभरात कंडोमवर उडवले १ लाख रुपये; इन्स्टामार्टच्या अहवालातून धक्कादायक आकडेवारी उघड

Quick Commerce Boom 2025 : २०२५ च्या अहवालात जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान १२० हून अधिक शहरांमध्ये दिलेल्या लाखो ऑर्डरचे विश्लेषण करण्यात आले. त्यात असे आढळून आले की एका व्यक्तीने दर ३६ तासांनी कंडोम ऑर्डर केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 12:59 IST2025-12-23T12:07:09+5:302025-12-23T12:59:42+5:30

Quick Commerce Boom 2025 : २०२५ च्या अहवालात जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान १२० हून अधिक शहरांमध्ये दिलेल्या लाखो ऑर्डरचे विश्लेषण करण्यात आले. त्यात असे आढळून आले की एका व्यक्तीने दर ३६ तासांनी कंडोम ऑर्डर केले.

Quick Commerce Boom 2025 Chennai Man Spends Over ₹1 Lakh on Condoms via Instamart | 'या' पठ्ठ्याने वर्षभरात कंडोमवर उडवले १ लाख रुपये; इन्स्टामार्टच्या अहवालातून धक्कादायक आकडेवारी उघड

'या' पठ्ठ्याने वर्षभरात कंडोमवर उडवले १ लाख रुपये; इन्स्टामार्टच्या अहवालातून धक्कादायक आकडेवारी उघड

Quick Commerce Boom 2025 : भारतात 'क्विक कॉमर्स' सेवांनी बाजारपेठेत मोठी क्रांती घडवून आणली आहे. जेवण, भाजीपाला इतकंच नाही, तर आता सोने आणि महागडे आयफोनही १० ते १५ मिनिटांत घरी पोहोचू लागले आहेत. 'इन्स्टामार्ट'ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या ‘हाऊ इंडिया इन्स्टामार्टेड २०२५’ या वार्षिक अहवालात भारतीयांच्या खरेदीच्या सवयींबद्दल काही थक्क करणारे आकडे समोर आले आहेत. यात चेन्नईच्या एका ग्राहकाने कंडोम खरेदीचा केलेला विक्रम चर्चेचा विषय ठरला आहे.

दर ३६ तासाला कंडोमची ऑर्डर!
चेन्नईतील एका ग्राहकाने २०२५ या वर्षात चक्क २२८ वेळा कंडोमच्या ऑर्डर्स दिल्या. यासाठी ग्राहकाने वर्षभरात कंडोम खरेदीवर तब्बल १,०६,३९८ रुपये खर्च केले. सरासरी काढल्यास हा ग्राहक दर ३६ तासाला एकदा कंडोम ऑर्डर करत होता. अहवालानुसार, सप्टेंबर महिन्यात कंडोमच्या विक्रीत २४ टक्क्यांची मोठी वाढ नोंदवण्यात आली. विशेष म्हणजे, इन्स्टामार्टवर येणाऱ्या दर १२७ ऑर्डर्सपैकी एका ऑर्डरमध्ये कंडोमचा समावेश असतो.

सोन्याची नाणी आणि आयफोनची 'होम डिलिव्हरी'

  • क्विक कॉमर्सचा विस्तार आता केवळ दैनंदिन गरजेच्या वस्तूंपुरता मर्यादित राहिलेला नाही.
  • मुंबईची 'सुवर्ण' खरेदी : मुंबईतील एका ग्राहकाने एकाच वेळी १५.१६ लाख रुपयांचे सोने इन्स्टामार्टवरून ऑर्डर केले.
  • हैदराबादचा आयफोन : हैदराबादमधील एका रहिवाशाने ४.३ लाख रुपयांचे आयफोन १० मिनिटांत घरपोच मागवले.
  • विक्रमी टिप : बेंगळुरूमधील एका उदार ग्राहकाने डिलिव्हरी बॉयला चक्क ६८,६०० रुपये टिप देऊन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला.

वाचा - तरुणांसाठी मोठी बातमी! न्यूझीलंडमध्ये दरवर्षी मिळणार ५००० तरुणांना नोकरी; केंद्र सरकारचा 'मेगा प्लॅन'

२२ लाखांची एकाच दिवसात खरेदी
इन्स्टामार्टच्या सर्वात मोठ्या ग्राहकाने एकाच वर्षात तब्बल २२ लाख रुपयांची खरेदी केली आहे. या खरेदीत २२ 'आयफोन १७', २४ कॅरेट सोन्याची नाणी आणि दूध-अंडी यांसारख्या दैनंदिन वस्तूंचा समावेश होता. ही आकडेवारी स्पष्ट करते की, भारतीय ग्राहक आता महागड्या वस्तू खरेदी करण्यासाठी शोरूममध्ये जाण्याऐवजी १० मिनिटांच्या डिलिव्हरी ॲप्सवर अधिक विश्वास टाकत आहेत.
 

Web Title : चेन्नई के शख्स ने एक साल में कंडोम पर खर्च किए ₹1 लाख: रिपोर्ट

Web Summary : इंस्टामार्ट की रिपोर्ट में खुलासा हुआ है कि चेन्नई के एक ग्राहक ने कंडोम पर ₹1 लाख खर्च किए, हर 36 घंटे में ऑर्डर दिया। मुंबई में ₹15 लाख की सोने की खरीदारी हुई, जबकि हैदराबाद में त्वरित वाणिज्य के माध्यम से ₹4.3 लाख का आईफोन मिला। बेंगलुरु ₹68,600 की टिप के साथ सबसे आगे रहा।

Web Title : Chennai man spends ₹1 lakh on condoms in a year: Report

Web Summary : Instamart's report reveals a Chennai customer spent ₹1 lakh on condoms, ordering every 36 hours. Mumbai saw a ₹15 lakh gold purchase, while Hyderabad got a ₹4.3 lakh iPhone via quick commerce. Bengaluru led with a ₹68,600 tip.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.