Lokmat Money > बिझनेस न्यूज > ४०० फूट उंच ३४व्या मजल्यावर बांधला अलिशान महाल! किंमत आणि मालकाचं नाव वाचून विश्वास नाही बसणार

४०० फूट उंच ३४व्या मजल्यावर बांधला अलिशान महाल! किंमत आणि मालकाचं नाव वाचून विश्वास नाही बसणार

The Most Expensive Penthouse in India : कोट्यवधी रुपये खर्च करुन ४०० फूट उंचीवर आलिशान महाल बांधला. पण, प्रत्यक्षात मालक तिथं फार काळ राहू शकला नाही. या ठिकाणी सर्व लक्झरी सुविधा उपलब्ध आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 14:36 IST2024-12-09T14:30:19+5:302024-12-09T14:36:25+5:30

The Most Expensive Penthouse in India : कोट्यवधी रुपये खर्च करुन ४०० फूट उंचीवर आलिशान महाल बांधला. पण, प्रत्यक्षात मालक तिथं फार काळ राहू शकला नाही. या ठिकाणी सर्व लक्झरी सुविधा उपलब्ध आहेत.

property most expensive penthouse mallya mansion on top of the kingfisher tower in bangalore | ४०० फूट उंच ३४व्या मजल्यावर बांधला अलिशान महाल! किंमत आणि मालकाचं नाव वाचून विश्वास नाही बसणार

४०० फूट उंच ३४व्या मजल्यावर बांधला अलिशान महाल! किंमत आणि मालकाचं नाव वाचून विश्वास नाही बसणार

The Most Expensive Penthouse in India : भारतात राजेमहाराजे काळापासून राहण्यासाठी भव्यदिव्य महाल बांधण्याची परंपरा आहे. आजही लोक कोट्यवधी रुपये खर्च घरुन महाल उभे करतात. सध्याच्या काळात उद्योगपती मुकेश अंबानी यांचे अँटिलिया हे घर सर्वात महागडे असल्याचे बोलले जाते. मात्र, एक महाल असाही आहे, जो पाहून तुम्हीही आश्चर्यचकीत झाल्याशिवाय राहणार नाही. हा महाल जमिनीपासून ४०० फूट उंचीवर ३४ व्या मजल्यावर बांधला आहे.

वास्तविक, हा आलिशान महाल एका बहुमजली इमारतीच्या छतावर बांधला आहे. व्हाईट हाऊससारखा दिसणारा हा २ मजली बंगला एखाद्या स्वप्नातील घरापेक्षा कमी नाही. डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, मल्ल्या मॅन्शनची किंमत सुमारे २० मिलियन डॉलर (सुमारे १७० कोटी रुपये) आहे. 

हेलिपॅड ते स्विमिंग पूल
हा आलिशान महाल बेंगळुरूमधील यूबी सिटीमध्ये असलेल्या किंगफिशर टॉवरच्या वर बांधला आहे. हा बंगला एका बहुमजली इमारतीच्या वरच्या कँटीलिव्हर स्लॅबवर आहे. याचा परिसर ४.५ एकरमध्ये पसरलेला आहे. विशेष म्हणजे हा बंगला जमिनीपासून ४०० फूट उंचीवर बांधण्यात आला आहे. या आलिशान हवेलीमध्ये वाईन सेलर, इनडोअर हॉट पूल आणि आउटडोअर इन्फिनिटी पूल आहे. हेलिकॉप्टर उतरण्यासाठी छतावरच हेलिपॅड आहे, यावरून या बंगल्याची भव्यता लक्षात येते. याशिवाय या बंगल्याभोवती फिरण्यासाठी स्काय डेक सारखी सुविधा आहे, जिथून संपूर्ण बेंगळुरू शहर पाहता येते.

भारतातून पळून गेलेला पळपुटा उद्योगपती विजय मल्ल्या यांचा हा भव्य महाल आहे. विजय मल्ल्या यांनी हा बंगला मोठ्या थाटात बांधला पण त्यात ते राहू शकले नाहीत. बेंगळुरूमध्ये बांधलेला किंगफिशर टॉवर युनायटेड ब्रेवरीज होल्डिंग्स लिमिटेड (विजय मल्ल्याची कंपनी) आणि प्रेस्टिज ग्रुपचा जॉइंट व्हेंचर आहे. ही इमारत बेंगळुरूमधील सर्वात हाय प्रोफाईल भाग असलेल्या UB सिटीमध्ये बांधली गेली आहे. या टॉवरमधील एका फ्लॅटची किंमत ५० कोटींहून अधिक आहे. या सोसायटीत अनेक अब्जाधीश उद्योगपती राहतात, ज्यात इन्फोसिसचे नारायण मूर्ती, सुधा मूर्ती, झिरोधाचे निखिल कामत आणि बायोकॉनचे किरण मुझुमदार शॉ आणि इतर सेलिब्रिटी आहेत.
 

 

Web Title: property most expensive penthouse mallya mansion on top of the kingfisher tower in bangalore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.