Lokmat Money > बिझनेस न्यूज > सरत्या वर्षात घरांच्या किमती २१ टक्क्यांनी वाढल्या! 7 शहरांची आकडेवारी चिंताजनक, काय आहे कारण?

सरत्या वर्षात घरांच्या किमती २१ टक्क्यांनी वाढल्या! 7 शहरांची आकडेवारी चिंताजनक, काय आहे कारण?

House Price : तुम्ही जर शहरात हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पाहात असाल तर ही बातमी तुमची झोप उडवू शकते. कारण, वर्षात घरांच्या किमतीत खूप वाढ झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 15:14 IST2024-12-29T15:14:18+5:302024-12-29T15:14:18+5:30

House Price : तुम्ही जर शहरात हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पाहात असाल तर ही बातमी तुमची झोप उडवू शकते. कारण, वर्षात घरांच्या किमतीत खूप वाढ झाली आहे.

property home price rise over 21 percent in 2024 anarock revealed shocking report | सरत्या वर्षात घरांच्या किमती २१ टक्क्यांनी वाढल्या! 7 शहरांची आकडेवारी चिंताजनक, काय आहे कारण?

सरत्या वर्षात घरांच्या किमती २१ टक्क्यांनी वाढल्या! 7 शहरांची आकडेवारी चिंताजनक, काय आहे कारण?

House Price : मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरात रोजगारासाठी आलेल्या प्रत्येकाचं स्वतः घरं घेण्याचं स्वप्न असतं. मात्र, घर घेण्याचं स्वप्न दिवसेंदिवस धूसर होत चाललं आहे. तुम्हीही घर घेण्याच्या तयारीत असाल तर ही बातमी तुम्हाला वास्तवाची जाणीव करुन देईल. साल २०२४ मध्ये देशातील ७ प्रमुख शहरांमधील घरांच्या किंमती २१ टक्क्यांनी वाढल्या आहेत. वाढत्या किमतींमुळे घरांच्या विक्रीत घट झाली असून देशातील ७ प्रमुख शहरांमधील विक्री ४ टक्क्यांनी घसरून ४.६ लाखांवर आली आहे. एकीकडे घरांच्या संख्येत घट झाली आहे, तर दुसरीकडे किमतीत मात्र झपाट्याने वाढ झाली आहे. वर्षभरात घरांच्या किमतीत १६ टक्क्यांनी वाढ झाली असून एकूण विक्री ५.६८ लाख कोटी रुपयांवर पोहोचण्याचा अंदाज आहे.

रिअल इस्टेट तज्ज्ञांच्या मते, जमिनी, मजूर आणि काही बांधकाम कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे या वर्षी ७ प्रमुख शहरांमधील सरासरी घरांच्या किमती २१ टक्क्यांनी वाढल्या आहेत. याचा परिणाम थेट घरांच्या विक्रीवरही झाला आहे. यासंदर्भात एक भारतातील आघाडीच्या गृहनिर्माण ब्रोकरेज कंपनीचं म्हणणं आहे, की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान मंजूरींमध्ये विलंब आणि गृहनिर्माण प्रकल्पांमधील घरांची मागणी कमी झाल्याने विक्रीत घट झाली आहे. तरीही घरांच्या वाढत्या किमतींमुळे या वर्षी किमतीच्या दृष्टीने विक्रीत मोठी वाढ झाली आहे.

किती घरे विकली गेली?
एका गृहनिर्माण कंपनीच्या बाजार डेटानुसार, ज्यामध्ये २०२३ मधील ४,७६,५३० युनिट्सच्या तुलनेत २०२४ मध्ये ७ प्रमुख शहरांमधील विक्री किंचित ४ टक्क्यांनी घसरून ४,५९,६५० युनिट्सवर येण्याची अपेक्षा आहे. निवासी युनिट्सचे एकूण विक्री मूल्य २०२४ मध्ये वार्षिक १६ टक्क्यांनी वाढून ५.६८ लाख कोटी रुपये होईल, जे मागील वर्षी ४.८८ लाख कोटी रुपये होते.

नवीन घरे बांधण्यात मंदी
नवीन निवासी मालमत्तांच्या पुरवठ्यावरील डेटानुसार, २०२३ मध्ये ४,४५,७७० युनिट्सच्या तुलनेत, २०२४ मध्ये ही संख्या ७ टक्क्यांनी घटून ४,१२,५२० युनिट्सवर आली आहे. ब्रोकरेज कंपनीचे चेअरमन म्हणाले, '२०२४ हे वर्ष भारतीय गृहनिर्माण क्षेत्रासाठी संमिश्र ठरले आहे. सार्वत्रिक आणि विधानसभा निवडणुकीच्या नकारात्मक प्रभावाव्यतिरिक्त, प्रकल्प लॉन्चमध्ये देखील घट झाली आहे, ज्यामुळे नवीन घरांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

एका बाजूला कमी आणि दुसरीकडे वाढ
२०२३ च्या तुलनेत विक्रीत किंचित घट झाली आहे. पण, सरासरी किमतीत वाढ आणि युनिट आकारात वाढ झाल्यामुळे एकूण विक्री मूल्यात १६ टक्के वाढ झाल्याने याची भरपाई झाली. २०२४ मध्ये पहिल्या ७ शहरांमधील सरासरी किमतीत वार्षिक २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Web Title: property home price rise over 21 percent in 2024 anarock revealed shocking report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.