Budget 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांची बल्ले-बल्ले, 25 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर मिळणार मोठा फायदा

प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांची बल्ले-बल्ले, 25 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर मिळणार मोठा फायदा

खासगी नोकरी करणाऱ्यांनाही सरकारने यावेळी अर्थसंकल्पात मोठी भेट दिली आहे...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 03:20 PM2023-02-02T15:20:23+5:302023-02-02T15:21:43+5:30

खासगी नोकरी करणाऱ्यांनाही सरकारने यावेळी अर्थसंकल्पात मोठी भेट दिली आहे...

Private jobbers will get big benefits up to Rs 25 lakh leave encashment limit of 3 lakh for tax exemption is raised to 25 lakh | प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांची बल्ले-बल्ले, 25 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर मिळणार मोठा फायदा

प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांची बल्ले-बल्ले, 25 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर मिळणार मोठा फायदा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2023 सादर केला आहे. या अर्थसंकल्पात तंत्रज्ञान, नवनिर्मिती आणि आत्मनिर्भर अर्थव्यवस्था विकसित करण्यावर भर देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याच बरोबर, जवळपास सर्वच वर्गातील लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. दुसरीकडे खासगी नोकरी करणाऱ्यांनाही सरकारने यावेळी अर्थसंकल्पात मोठी भेट दिली आहे.

लिव्ह एनकॅशमेन्ट -
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात खाजगी नोकऱ्या करणाऱ्या लोकांना लिव्ह एनकॅशमेन्टमध्ये दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लिव्ह एनकॅशमेन्टमध्ये टॅक्स सूट 3 लाख रुपयांवरून वाढून 25 लाख रुपये करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

टॅक्स -
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या या घोषणेचा अर्थ, आता लिव्ह एनकॅशमेन्टमध्ये टॅक्स सूटची मर्यादा तीन लाख रुपयांवरून 25 लाख रुपये करण्यात आला आहे. लिव्ह एनकॅशमेन्ट च्या माध्यमाने जी रक्कम मिळते, तो सॅलरीचाच भाग मानला जातो आणि सरकार यावर टॅक्स लावत असते. मात्र आता 25 लाख रुपयांपर्यंतच्या लिव्ह एनकॅशमेन्टवर प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांना कुठलाही टॅक्स द्यावा लागणार नाही.

सुट्ट्यांची पैस -
नोकरीदरम्यान कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारच्या सुट्ट्या मिळतात. यात Casual Leave, Sick Leave, Paid Leave आदींचा समावेश असतो. यांपैकी काही सुट्ट्या ठरलेल्या वेळेत घेतल्या नाही, तर त्या लॅप्स होतात. तसेच काही सुट्ट्या दर वर्षी जोडल्या जातात. तसेच जेव्हा एखादी व्यक्ती नोकरी बदलते अथवा रिटायर होते, तेव्हा ज्या सुट्ट्या दरवर्षी जोडल्या गेल्या आहेत, त्या उरलेल्या सुट्ट्या कॅश करू शकते. यालाच लिव्ह एनकॅशमेन्ट म्हटले जाते.

Web Title: Private jobbers will get big benefits up to Rs 25 lakh leave encashment limit of 3 lakh for tax exemption is raised to 25 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.