Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > कॅन्सर औषधांच्या किमती ५०% ने वाढणार; कंपन्यांची सरकारकडे मोठी मागणी, नेमकं कारण काय..?

कॅन्सर औषधांच्या किमती ५०% ने वाढणार; कंपन्यांची सरकारकडे मोठी मागणी, नेमकं कारण काय..?

Cancer Medicine: दरवाढीचा रुग्णांना फटका बसणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 16:11 IST2026-04-06T16:11:34+5:302026-04-06T16:11:52+5:30

Cancer Medicine: दरवाढीचा रुग्णांना फटका बसणार!

Prices of cancer medicines will increase by 50%; Companies are making huge demands on the government, what is the real reason..? | कॅन्सर औषधांच्या किमती ५०% ने वाढणार; कंपन्यांची सरकारकडे मोठी मागणी, नेमकं कारण काय..?

कॅन्सर औषधांच्या किमती ५०% ने वाढणार; कंपन्यांची सरकारकडे मोठी मागणी, नेमकं कारण काय..?

Cancer Medicine: कॅन्सरवरील औषधे बनवणाऱ्या औषध कंपन्यांनी सरकारकडे औषधांच्या किमतीत ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची परवानगी मागितली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात प्लॅटिनम धातूच्या किमतीत मोठी वाढ झाल्यामुळे कॅन्सर औषधांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सध्याच्या किमतीत उत्पादन तयार करणे कंपन्यांसाठी तोट्याचे ठरत असल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे.

प्लॅटिनम महागल्यामुळे उत्पादन खर्च वाढला

कॅन्सर उपचारात वापरल्या जाणाऱ्या कार्बोप्लाटिन, ऑक्सालिप्लाटिन आणि सिस्प्लाटिन या औषधांच्या निर्मितीत प्लॅटिनम हा महत्त्वाचा घटक आहे. मात्र गेल्या काही महिन्यांत प्लॅटिनमच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. सप्टेंबरमध्ये प्लॅटिनमची किंमत सुमारे ३,८६९ रुपये प्रति ग्रॅम होती, जी फेब्रुवारीमध्ये वाढून सुमारे ८,९९९ रुपये प्रति ग्रॅमवर पोहोचली आहे. जागतिक राजकीय अनिश्चितता हे या दरवाढीचे प्रमुख कारण असल्याचे उद्योग क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

कंपन्यांची सरकारकडे मागणी

औषध उत्पादक कंपन्यांनी नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) कडे या औषधांच्या कमाल किमतीत ५०% वाढ करण्याची मागणी केली आहे.

सध्या औषधांच्या कमाल किमती:

कार्बोप्लाटिन - ६१.१० रुपये प्रति १० mg/ml वायल
सिस्प्लाटिन - ७० ते ३०० रुपये (डोसनुसार)

ही औषधे बनवणाऱ्या प्रमुख कंपन्या:

सिप्ला
इंटास
डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज
जाइडस लाइफसायन्सेस
एमक्योर
फ्रेसेनियस
हेटेरो

या कंपन्यांचे म्हणणे आहे की, किंमत वाढ मंजूर झाली नाही, तर या महत्त्वाच्या औषधांचे उत्पादन सुरू ठेवणे कठीण होऊ शकते.

कॅन्सर उपचारासाठी अत्यंत महत्त्वाची औषधे

तज्ज्ञांच्या मते, प्लॅटिनम-आधारित औषधे अनेक कॅन्सर उपचारांसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. ही औषधे डोकं आणि मान कॅन्सर, स्तन कॅन्सर, पोट आणि आतड्यांचा कॅन्सर, अंडाशयाचा कॅन्सर आणि फुफ्फुसांच्या कॅन्सरमध्ये वापरली जातात. ही औषधे कीमोथेरपीमध्ये सर्वात स्वस्त आणि सर्वाधिक वापरली जाणारी औषधे आहेत.

तज्ज्ञांच्या मते एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. ही औषधे इम्युनोथेरपी किंवा नवीन कॅन्सर उपचारांपेक्षा खूप स्वस्त आहेत. पण कमी किंमतीमुळे कंपन्यांना उत्पादनात नफा राहत नाही. त्यामुळे उत्पादन कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे भविष्यात कॅन्सर रुग्णांना औषधांची कमतरता भासू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

११० कोटी रुपयांचा बाजार

बाजार संशोधन संस्थेच्या माहितीनुसार, प्लॅटिनम-आधारित कॅन्सर औषधांचा बाजार सुमारे ११० कोटी रुपये आहे. दरवर्षी या बाजारात १४% वाढ होते. तज्ज्ञांच्या मते कॅन्सर रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे हा बाजार भविष्यात आणखी मोठा होऊ शकतो.

सरकार नियंत्रित किंमत

विशेष म्हणजे, या औषधांच्या किमती २०१३ पासून सरकारच्या नियंत्रणाखाली आहेत. २०१५ पासून आतापर्यंत कार्बोप्लाटिनच्या किमतीत फक्त २१.७१% वाढ झाली आहे, असे उद्योग क्षेत्रातील सूत्रांचे म्हणणे आहे. २०१९ मध्ये नीती आयोगाने आर्थिकदृष्ट्या उत्पादन करणे अवघड असलेल्या आवश्यक औषधांच्या किमतीत एकदाच ५०% वाढ करण्याची शिफारस केली होती.

Web Title : कैंसर दवाओं की कीमतें 50% तक बढ़ सकती हैं; कंपनियों ने सरकार से मंजूरी मांगी।

Web Summary : कैंसर दवा निर्माताओं ने प्लेटिनम की बढ़ती लागत के कारण 50% मूल्य वृद्धि का अनुरोध किया है, जो एक महत्वपूर्ण घटक है। उत्पादन लागत वर्तमान कीमतों से अधिक है। आवश्यक कीमोथेरेपी दवाएं खतरे में हैं, जिससे मूल्य वृद्धि स्वीकृत नहीं होने पर रोगियों के लिए संभावित रूप से कमी हो सकती है।

Web Title : Cancer drug prices may rise 50%; companies seek government approval.

Web Summary : Cancer medicine manufacturers are requesting a 50% price increase due to rising platinum costs, a key ingredient. Production costs are exceeding current prices. Essential chemotherapy drugs are at risk, potentially causing shortages for patients if price hikes aren't approved.