Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > विमा एजंटच्या अधिक कमिशनला चाप लावण्याची तयारी, कंपन्यांनी एका वर्षात वाटले ६०,८०० कोटी रुपये

विमा एजंटच्या अधिक कमिशनला चाप लावण्याची तयारी, कंपन्यांनी एका वर्षात वाटले ६०,८०० कोटी रुपये

Insurance Companies: विमा बाजारातील एजंटांना मिळणाऱ्या भरमसाठ कमिशनला आता कात्री लागण्याची शक्यता आहे. पाहा नियामक काय करण्याच्या तयारीत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 10:34 IST2026-01-07T10:34:39+5:302026-01-07T10:34:39+5:30

Insurance Companies: विमा बाजारातील एजंटांना मिळणाऱ्या भरमसाठ कमिशनला आता कात्री लागण्याची शक्यता आहे. पाहा नियामक काय करण्याच्या तयारीत आहे.

Preparations to curb excess commission of insurance agents companies have allocated Rs 60800 crore in a year | विमा एजंटच्या अधिक कमिशनला चाप लावण्याची तयारी, कंपन्यांनी एका वर्षात वाटले ६०,८०० कोटी रुपये

विमा एजंटच्या अधिक कमिशनला चाप लावण्याची तयारी, कंपन्यांनी एका वर्षात वाटले ६०,८०० कोटी रुपये

Insurance Companies: विमा बाजारातील एजंटांना मिळणाऱ्या भरमसाठ कमिशनला आता कात्री लागण्याची शक्यता आहे. ग्राहकांना 'मिस-सेलिंग' आणि महागड्या प्रीमियमपासून वाचवण्यासाठी नवीन नियम बनवण्याची तयारी सुरू आहे. विमा नियामक IRDAI नं इशारा दिलाय की, वितरण (पॉलिसी विक्री) खर्च वाढल्यामुळे विम्याचा प्रीमियम महाग होत आहे. कंपन्यांकडून एजंट्सना जास्त पैसे देण्याच्या नादात सर्वसामान्यांना महागडी पॉलिसी खरेदी करावी लागत आहे.

RBI नं देखील आपल्या अहवालात या वाढत्या खर्चावर चिंता व्यक्त केली आहे. उद्योगातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, जेव्हा पहिल्या वर्षी एजंट्सना खूप जास्त कमिशन मिळतं, तेव्हा मिस-सेलिंगची (चुकीची माहिती देऊन पॉलिसी विकणं) प्रकरणंही वाढतात. जास्त पैशांच्या लोभापायी एजंट ग्राहकांना चुकीच्या पद्धतीनं पॉलिसी विकतात. याचा फटका पॉलिसीधारकांना बसतो.

Post Office ची जबरदस्त स्कीम, व्हाल मालामाल; वाचवा केवळ ४०० रुपये; मिळेल २० लाख रुपयांचा निधी

६०,८०० कोटींचे कमिशन

आकडेवारीनुसार, २०२४-२५ मध्ये लाईफ इन्शुरन्स कंपन्यांनी कमिशन म्हणून ६०,८०० कोटी रुपये वाटले, जे मागील वर्षापेक्षा १८% जास्त आहे. याच काळात कंपन्यांच्या प्रीमियममध्ये (कमाई) केवळ ६.७३% वाढ झाली आहे.

Web Title : बीमा एजेंटों के ऊंचे कमीशन पर लगाम; कंपनियों ने बांटे ₹60,800 करोड़

Web Summary : बीमा नियामक IRDAI एजेंटों के अत्यधिक कमीशन पर अंकुश लगाने के लिए नए नियम बनाएगा, जिससे 'मिस-सेलिंग' और उच्च प्रीमियम को संबोधित किया जा सके। कमीशन 18% बढ़कर ₹60,800 करोड़ हो गया, जबकि प्रीमियम आय में केवल 6.73% की वृद्धि हुई। RBI ने पॉलिसीधारकों पर बढ़ते वितरण लागतों के बारे में भी चिंता जताई।

Web Title : Insurance Agents' High Commissions Face Curbs; Companies Paid ₹60,800 Crore

Web Summary : Insurance regulator IRDAI plans new rules to curb excessive agent commissions, addressing 'mis-selling' and high premiums. Commissions surged 18% to ₹60,800 crore, while premium income grew only 6.73%. RBI also flagged concerns about rising distribution costs impacting policyholders.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MONEYपैसा