Lokmat Money > बिझनेस न्यूज > एकदाच गुंतवणूक करा... दरमहा २०,००० रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, कोण घेऊ शकतो लाभ?

एकदाच गुंतवणूक करा... दरमहा २०,००० रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, कोण घेऊ शकतो लाभ?

Post Office Best Scheme : या योजनांमध्ये गुंतवणुकीवर तुम्हाला उत्तम परतावा मिळतोच, शिवाय सरकार स्वतः गुंतवणुकीच्या सुरक्षिततेची हमी देते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 15:14 IST2025-07-14T15:13:46+5:302025-07-14T15:14:54+5:30

Post Office Best Scheme : या योजनांमध्ये गुंतवणुकीवर तुम्हाला उत्तम परतावा मिळतोच, शिवाय सरकार स्वतः गुंतवणुकीच्या सुरक्षिततेची हमी देते.

Post Office Senior Citizen Savings Scheme Invest Once, Get ₹20,000 Monthly Pension | एकदाच गुंतवणूक करा... दरमहा २०,००० रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, कोण घेऊ शकतो लाभ?

एकदाच गुंतवणूक करा... दरमहा २०,००० रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, कोण घेऊ शकतो लाभ?

Post Office Best Scheme : निवृत्तीनंतर अनेकांना पेन्शनप्रमाणे मासिक उत्पन्न मिळवण्याची इच्छा असते. पण, सध्यातरी ही सुविधा फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच उपलब्ध आहे. पण, तुम्ही पोस्ट ऑफिसच्या योजनेतून याचा लाभ घेऊ शकता. याबाबतीत पोस्ट ऑफिसच्या लघु बचत योजना खूप लोकप्रिय आहेत. या योजनांमध्ये गुंतवणुकीवरील व्याज दर अनेकदा मुदत ठेवींपेक्षा जास्त असतात, शिवाय सरकार स्वतः गुंतवणूकदारांच्या पैशांच्या सुरक्षिततेची हमी देते.

ज्येष्ठ नागरिकांसाठी खास योजना
पोस्ट ऑफिसची अशीच एक खास योजना आहे, जी विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आली आहे, 'पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना' (SCSS). वृद्धापकाळात आर्थिक अडचणी येऊ नयेत म्हणून ही योजना खूप प्रभावी ठरू शकते. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही दरमहा २०,५०० रुपयांपर्यंत हमखास उत्पन्न मिळवू शकता.

फायदे आणि पात्रता
निवृत्तीनंतर नियमित मासिक उत्पन्न मिळवण्यासाठी ही योजना उत्तम पर्याय आहे. यात एकरकमी गुंतवणूक केल्यास निश्चित उत्पन्न मिळते. या योजनेत सध्या ८.२% व्याजदर मिळतो, जो बँकेच्या एफडीपेक्षा जास्त आहे. शिवाय, आयकर कलम ८०सी अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंतची कर सवलत मिळते. तुम्ही यात फक्त १,००० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

ही योजना ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या कोणत्याही व्यक्तीसाठी उपलब्ध आहे. तसेच, सरकारी नोकरीतून व्हीआरएस घेणारे ५५ ते ६० वयोगटातील किंवा संरक्षण दलातून निवृत्त झालेले ५० ते ६० वयोगटातील व्यक्तीही यात खाते उघडू शकतात.

२०,५०० रुपये मासिक उत्पन्न कसे मिळवाल?
या योजनेची मुदत ५ वर्षे असून यात जास्तीत जास्त ३० लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक करता येते. जर तुम्ही या योजनेत ३० लाख रुपये गुंतवले, तर ८.२% व्याजदराने तुम्हाला वार्षिक २.४६ लाख रुपये व्याज मिळेल. म्हणजेच, दरमहा तुम्हाला २०,५०० रुपये तुमच्या खात्यात जमा होतील.

खाते बंद करण्याचे नियम आणि कराचे नियम
तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये SCSS खाते उघडू शकता. महत्त्वाचं म्हणजे, हे खाते तुम्ही मुदतपूर्तीपूर्वी बंद करू शकता, पण त्यासाठी काही नियम आहेत. जर तुम्ही एक वर्षाच्या आत खाते बंद केले, तर व्याज मिळणार नाही. १ ते २ वर्षांच्या दरम्यान बंद केल्यास १.५% आणि २ ते ५ वर्षांच्या दरम्यान बंद केल्यास १% व्याज कापले जाईल.

वाचा - धक्कादायक! यावर्षी १.१२ कोटी SIP बंद, गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपासून दूर पळतायत? काय आहे कारण?

या योजनेचा एक महत्त्वाचा नियम असा आहे की, यातील व्याजाच्या रकमेवर कर (TDS) लागतो, जर व्याज ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल. मात्र, तुम्ही फॉर्म १५ जी किंवा १५ एच भरल्यास TDS कापला जात नाही.
ही योजना ज्येष्ठ नागरिकांना नियमित आणि सुरक्षित उत्पन्न मिळवण्यासाठी एक उत्तम संधी आहे.

Web Title: Post Office Senior Citizen Savings Scheme Invest Once, Get ₹20,000 Monthly Pension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.