Post Office Schemes : जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीबाबत कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करायची नसेल आणि दीर्घकालीन योजनेत पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही किसान विकास पत्रात (Kisan Vikas Patra) गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला या योजनेचा पर्याय मिळेल. या योजनेत तुम्हाला दुप्पट पैसे देण्याची सरकारी गॅरेंटी मिळते. म्हणजेच जर तुम्ही १० लाख रुपयांची गुंतवणूक करत असाल तर मॅच्युरिटीवर तुम्हाला २० लाख रुपये नक्की मिळतील. जाणून घेऊ गुंतवणुकीसाठी काय करावं लागेल आणि किती वेळात तुमचे पैसे दुप्पट होतील.
किती दिवसात पैसे दुप्पट होतील?
किसान विकास पत्र योजना कोणत्याही गुंतवणूकदाराला ११५ महिन्यांत (९ वर्षे, ७ महिने) गुंतवणूक दुप्पट करण्याची हमी देते. सध्या या योजनेवर ७.५ टक्के दरानं व्याज मिळत आहे. व्याजाची गणना वार्षिक आधारावर केली जाते. एखादी व्यक्ती १००० रुपयांपासून या योजनेत गुंतवणूक सुरू करू शकते आणि जास्तीत जास्त गुंतवणुकीची मर्यादा नाही. याशिवाय या योजनेअंतर्गत कितीही खाती उघडता येतात.
कोण उघडू शकतं खातं?
किसान विकास पत्र योजना १९८८ मध्ये सुरू झाली, तेव्हा शेतकऱ्यांची गुंतवणूक दुप्पट करण्याचं उद्दिष्ट होतं, पण आता ती सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. आता कोणतीही प्रौढ व्यक्ती सिंगल किंवा जॉइंट अकाउंट उघडू शकते. याशिवाय १० वर्षांवरील मूल आपल्या नावे किसान विकास पत्र घेऊ शकते. पालक अल्पवयीन वतीनं खातं उघडू शकतात. खातं उघडताना आधार कार्ड, वयाचा दाखला, पासपोर्ट साइज फोटो, केव्हीपी अॅप्लिकेशन फॉर्म आदी कागदपत्रांची आवश्यकता असू शकते. अनिवासी भारतीय या योजनेसाठी पात्र नाहीत.
कोणती कागदपत्रं आवश्यक?
खातं उघडताना आधार कार्ड, वयाचा दाखला, पासपोर्ट साइज फोटो, केव्हीपी अॅप्लिकेशन फॉर्म आदी कागदपत्रांची आवश्यकता असू शकते. अनिवासी भारतीय या योजनेसाठी पात्र नाहीत.