Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोबाईलचे Bluetooth ऑन असते? हेडफोन्स, स्मार्टवॉच वापरताय? मग ही बातमी तुमची झोप उडवेल

मोबाईलचे Bluetooth ऑन असते? हेडफोन्स, स्मार्टवॉच वापरताय? मग ही बातमी तुमची झोप उडवेल

Avoid Bluesnarfing : सायबर गुन्हेगारांनी आता ब्लूटूथ द्वारे लोकांचे मोबाईल, स्मार्टवॉच आणि लॅपटॉपसारखे डिव्हाइस लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 11:52 IST2024-12-09T11:47:07+5:302024-12-09T11:52:20+5:30

Avoid Bluesnarfing : सायबर गुन्हेगारांनी आता ब्लूटूथ द्वारे लोकांचे मोबाईल, स्मार्टवॉच आणि लॅपटॉपसारखे डिव्हाइस लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

Police Warn About Keeping Bluetooth On Avoid Bluesnarfing | मोबाईलचे Bluetooth ऑन असते? हेडफोन्स, स्मार्टवॉच वापरताय? मग ही बातमी तुमची झोप उडवेल

मोबाईलचे Bluetooth ऑन असते? हेडफोन्स, स्मार्टवॉच वापरताय? मग ही बातमी तुमची झोप उडवेल

Avoid Bluesnarfing : सायबर गुन्हेगारांनी सरकारच्या अक्षरशः नाकी नऊ आणले आहेत. वेगवेगळ्या उपाययोजना करुनही सायबर क्राईम थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. देशभरात रोज हजारो गुन्हे घडत आहेत. धक्कादायक म्हणजे तुम्हाला गुन्हा करण्याची एक पद्धत कळली की ते दुसरी शोधून टार्गेट करतात. त्यामुळे सायबर पोलीसही हतबल झाले आहेत. नागरिकांनी अधिक सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे. आता ब्लूस्नार्फिंग (Bluesnarfing) करुन लोकांचे स्मार्टफोन, टॅब्लेट, स्मार्टवॉच आणि लॅपटॉप टार्गेट केले जात आहे. यातून संवेदनशील माहिती चोरुन लोकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे.

ल्युटूथ तंत्रज्ञान हेडफोन, स्पीकर किंवा स्मार्टवॉच यांसारखी उपकरणे कनेक्ट करण्याचा एक सोयीस्कर मार्ग आहे. परंतु, ते सतत सक्रिय ठेवल्याने सायबर गुन्हेगार लक्ष्य करत असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. घरामध्ये ब्लूटूथ सुरू असेल तर काही अडचण नाही. पण, सार्वजनिक ठिकाणी वापरल्यास धोका लक्षणीय वाढतो. 

कसा होतो मोबाईल हॅक?
या सायबर हल्ल्याला 'ब्लूस्नार्फिंग' असं म्हणतात. याद्वारे कुठल्याही डिव्हाइसेसवर ब्लूटूथद्वारे अनधिकृत प्रवेश केला जातो. त्यानंतर संवेदनशील वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती चोरली जाते. याद्वारे युजर्सची मोठी आर्थिक फसवणूक केल्याच्या घटना घडल्या आहेत. सामान्यपणे स्मार्टफोन, टॅब्लेट, संगणक, स्मार्टवॉच आणि हेडफोन यांच्यावर हा हल्ला केला जातो. आता तुम्ही म्हणाल ब्लूटूथ कनेक्शनसाठी युजर्सची संमतीची आवश्यकता असते. पण, सायबर गुन्हेगार प्रगत प्रोग्रॅम वापरून संमतीविना तुमच्या डिव्हाइसमध्ये प्रवेश करू शकतात.

ब्लूस्नार्फिंगपासून सुरक्षित राहण्यासाठी काय करावं?

  • ब्लूटूथ वापरात नसताना बंद करा : तुमच्या डिव्हाइसवर ब्लूटूथची गरज नसताना ते बंद करा, विशेषतः सार्वजनिक ठिकाणी.
  • हाइड मोड वापरा : स्मार्टवॉच किंवा हेडफोनसाठी ब्लूटूथवर अवलंबून असलेल्या युजर्सने त्यांचे कनेक्शन इतरांपासून हाइड करा.
  • अज्ञात कनेक्टीविटी टाळा: अपरिचित डिव्हाइसेसवरून कधीही ब्लूटूथ कनेक्शन स्वीकारू नका.
  • तुमचे सॉफ्टवेअर नियमितपणे अपडेट करा : तुमच्या डिव्हाइसचे सॉफ्टवेअर नेहमी अपडेट करत राहा. त्यामुळे सुरक्षा आणखी वाढते.
  • हे उपाय तुमच्या वैयक्तिक आणि आर्थिक डेटाचे रक्षण करून तुमच्या डिव्हाइसवर अनधिकृत प्रवेशाचा धोका कमी करतात.

Web Title: Police Warn About Keeping Bluetooth On Avoid Bluesnarfing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.