Lokmat Money > बिझनेस न्यूज > Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती

Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती

सरकारचं ऑनलाइन गेमिंग विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेत मंजूर झालं. या विधेयकामुळे ऑनलाइन गेमिंग उद्योगात खळबळ उडाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 14:55 IST2025-08-23T14:54:51+5:302025-08-23T14:55:42+5:30

सरकारचं ऑनलाइन गेमिंग विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेत मंजूर झालं. या विधेयकामुळे ऑनलाइन गेमिंग उद्योगात खळबळ उडाली आहे.

Pokerbaazi shuts down all real money online games Nazara tech shares suffer know details | Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती

Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती

सरकारचं ऑनलाइन गेमिंग विधेयक (Online Gaming Bill 2025) लोकसभेनंतर राज्यसभेत मंजूर झालं. या विधेयकामुळे ऑनलाइन गेमिंग उद्योगात खळबळ उडाली आहे आणि विशेषतः रिअल मनी गेम्स (Real Money Games) व्यवसायाशी संबंधित कंपन्यांचे धाबे दणाणलेत. दरम्यान, आता पोकरबाजीनं शुक्रवारी जाहीर केलं की त्यांनी पैशांचा वापर करुन खेळले जाणारे ऑनलाइन गेम बंद केले आहेत.

लिस्टेड कंपनी नझारा टेक्नॉलॉजीजनं दिलेल्या माहितीनुसार त्यांची सहयोगी फर्म मूनशाईन टेक्नॉलॉजीजनं रिअल मनी ऑनलाइन गेमिंग ऑपरेशन्स बंद केल्या आहेत. मूनशाईन टेक्नॉलॉजीज पोकरबाजी आणि इतर कार्ड-आधारित प्लॅटफॉर्म चालवतात. शुक्रवारी नझारा टेक्नॉलॉजीजचे शेअर्स जवळजवळ ५ टक्क्यांनी घसरून ११४५.५५ रुपयांवर आले. मूनशाईन टेक्नॉलॉजीजमध्ये नझारा टेक्नॉलॉजीजचा ४६.०७ टक्के हिस्सा आहे.

५ दिवसांत मोठी घसरण

गेल्या पाच दिवसांत ऑनलाइन गेमिंग कंपनी नझारा टेक्नॉलॉजीजचे शेअर्स १७ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. या काळात नझारा टेक्नॉलॉजीजचे शेअर्स १३९०.५० रुपयांवरून ११४५.५५ रुपयांवर आलेत. नझारा टेक्नॉलॉजीजच्या लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअर्ससाठी हा सर्वात वाईट ट्रेडिंग आठवडा असेल. नझारा टेक्नॉलॉजीजच्या महसुलावर किंवा EBITDA वर कोणताही परिणाम होणार नाही, कारण मूनशाईनचा महसूल कंपनीच्या आर्थिक खात्यांमध्ये समाविष्ट केलेला नाही.

गेल्या ६ महिन्यांत नझारा टेक्नॉलॉजीजच्या शेअर्समध्ये २४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. नझारा टेक्नॉलॉजीजच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी १४५० रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ८३५.३० रुपये आहे.

अन्य कंपन्यांनीही गेम्स केले बंद

गेमिंग कंपन्यांनी रिअल-मनी गेमिंग ऑफरिंग बंद करण्यास सुरुवात केली आहे. फॅन्टसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म ड्रीम११ नं म्हटलंय की ते शुक्रवारपासून त्यांचे रिअल मनी गेम्स बंद करेल. गुरुग्रामस्थित झुपीनं (Zupee) देखील म्हटलंय की ते त्यांचे पेड गेम्स बंद करत आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टमध्ये यासंदर्भातील माहिती देण्यात आलीये. यापूर्वी, पीक एक्सव्ही पार्टनर्स-समर्थित प्रोबोनं त्यांचे रिअल-मनी गेमिंग ऑपरेशन्स बंद करण्याची घोषणा केली होती. बेंगळुरूस्थित मोबाइल प्रीमियर लीगनं म्हटलंय की ते त्यांच्या प्लॅटफॉर्मवरील त्यांचे मनी-बेस्ड गेम्स बंद करत आहेत.

Web Title: Pokerbaazi shuts down all real money online games Nazara tech shares suffer know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.