lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पीएनबी सहा महिन्यांत धक्क्यातून सावरेल

पीएनबी सहा महिन्यांत धक्क्यातून सावरेल

अब्जाधीश हिरे व्यावसायिक नीरव मोदी याने निर्माण केलेल्या १३ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ््याच्या धक्क्यातून पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) सहा महिन्यांत सावरेल, असा विश्वास सरकारी मालकीच्या या बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांनी रविवारी व्यक्त केला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 01:19 AM2018-04-09T01:19:13+5:302018-04-09T01:19:13+5:30

अब्जाधीश हिरे व्यावसायिक नीरव मोदी याने निर्माण केलेल्या १३ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ््याच्या धक्क्यातून पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) सहा महिन्यांत सावरेल, असा विश्वास सरकारी मालकीच्या या बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांनी रविवारी व्यक्त केला.

PNB will be shocked in six months | पीएनबी सहा महिन्यांत धक्क्यातून सावरेल

पीएनबी सहा महिन्यांत धक्क्यातून सावरेल

नवी दिल्ली : अब्जाधीश हिरे व्यावसायिक नीरव मोदी याने निर्माण केलेल्या १३ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ््याच्या धक्क्यातून पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) सहा महिन्यांत सावरेल, असा विश्वास सरकारी मालकीच्या या बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांनी रविवारी व्यक्त केला.
नीरव मोदी व त्याचा मामा मेहुल चोक्सी व त्यांच्या सहकाऱ्यांनी बँकेच्या मुंबईतील शाखेतील काही मोठ्या अधिकाºयांना हाताशी धरून केलेला हा देशात बँकेत झालेला हा सर्वात मोठा घोटाळा मानला जात आहे. हा घोेटाळा उघडकीस आल्यानंतर, या परिस्थितीतून सावरण्यासाठी सरकार, कर्मचारी व इतर संबंधितांनी बँकेला मोठा पाठिंबा दिला, असे मेहता यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.
मेहता म्हणाले, जे काही वाईट घडले, ते आमच्या मागे आहे. शस्त्रक्रिया पूर्ण झाली असून, प्रत्येक गोष्ट आता नियंत्रणात असल्याचे दिसते. आता आम्ही वसुलीच्या टप्प्यात आहोत. हा संपूर्ण प्रश्न आणि वेदनेतून आम्ही येत्या सहा महिन्यांत बाहेर पडू शकू, अशी आम्हाला अपेक्षा आहे. बँकेचा प्रदीर्घ वारसा आणि बळ यावर भर देताना मेहता यांनी सांगितले की, लाला लजपत राय यांनी स्वदेशी चळवळीत १२३ वर्षांपूर्वी ही बँक स्थापन केली होती.
बँकेच्या सात हजार शाखांचा विस्तार देशभर झालेला असून, देशातील बाजारात बँकेचा १० लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय आहे. त्यामुळे घोटाळा उघडकीस आल्यानंतरच्या दिवसांत या स्वरूपाच्या झालेल्या फसवणुकीने आमच्या ग्राहकांचा आत्मविश्वास ठाम राहिला. एवढेच काय, त्या त्रासदायक दिवसांत बँकेचा व्यवसाय उद्योगापेक्षाही चांगला वाढला, असे ते म्हणाले. मेहता म्हणाले की, जे मार्गदर्शन मिळाले, त्याची माहिती गुंतवणूकदारांना दिल्यावर पत १० टक्क्यांनी वाढली.

Web Title: PNB will be shocked in six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.