Lokmat Money > बिझनेस न्यूज > प्लास्टोची १० हजार लिटरची टँक बाजारात

प्लास्टोची १० हजार लिटरची टँक बाजारात

टँक आणि पाईप उत्पादक कंपनी आर.सी. प्लास्टोने १० हजार लिटर क्षमतेची स्टोरेज टँक बाजारात आणली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 04:09 AM2019-05-30T04:09:29+5:302019-05-30T04:09:36+5:30

टँक आणि पाईप उत्पादक कंपनी आर.सी. प्लास्टोने १० हजार लिटर क्षमतेची स्टोरेज टँक बाजारात आणली

Plasto's 10 thousand liters tank in the market | प्लास्टोची १० हजार लिटरची टँक बाजारात

प्लास्टोची १० हजार लिटरची टँक बाजारात

नागपूर : टँक आणि पाईप उत्पादक कंपनी आर.सी. प्लास्टोने १० हजार लिटर क्षमतेची स्टोरेज टँक बाजारात आणली असून देशात सर्वत्र उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जास्तीत जास्त पाण्याचा साठा करण्याची टँकची क्षमता आहे. रोटो मोल्ड तंत्रज्ञानाने टँक तयार केली आहे. रोटो मोल्ड प्लास्टिक वॉटर स्टोरेज टँक लायनर कमी डेन्सिटी पॉलिथीनपासून तयार होतात. यामुळे टँक स्वच्छ राहते आणि दुर्गंध येत नाही. पाणी जास्त प्रमाणात साठवून ठेवता येते. टँकचा उपयोग घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक प्रतिष्ठान, वसतिगृह, रुग्णालय, शाळा, चित्रपटगृह आणि बांधकामाच्या ठिकाणी पाणी साठविण्यासाठी करता येईल. टँक आयएसआय प्रमाणित आणि फूड ग्रेड स्वीकृत आहे. त्यामुळे पाण्यासाठी सुरक्षित आहे. भारतात वातावरणात होणारे बदल लक्षात घेता टँकची निर्मिती केली आहे. टँकचा उपयोग विविध पाईप आणि फिटिंगसह करता येऊ शकतो. गरम आणि थंड पाण्याचे ट्यूब, वॉटर ट्रीटमेंट आणि रासायनिक सयंत्रांसह औद्योगिक पाईप फिटिंग करण्यासाठी उपयुक्त आहे. टँक विविध प्रकारात डबल, ट्रिपल आणि चार थरात उपलब्ध आहे. ग्राहकांच्या गरजा ओळखून टँकचे डिझाईन केले आहे. प्रत्येक उत्पादनाचे परीक्षण करण्यात आले आहे. हे उत्पादन देशातील सर्व अधिकृत डीलर्सकडे उपलब्ध आहेत. कारखाना वाडी टोल नाक्याजवळ, डी-२ ए, हिंगणा एमआयडीसी येथे आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)

Web Title: Plasto's 10 thousand liters tank in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.