PF withdrawal through ATMs on cards :एटीएममधून (ATM) आता ईपीएफओचे (EPFO) पैसे काढण्याची सुविधा मिळणार असल्याची बातमी समोर आली आहे. पुढील वर्षीपासून ही सुविधा उपलब्ध होईल. यानंतर, ईपीएफओ पैसे काढण्याच्या योजनेअंतर्गत भविष्य निर्वाह निधी सदस्य किंवा ग्राहकांना बँकिंगसारख्या सुविधा मिळू शकतील, असे म्हटले जात आहे.
तुम्ही तुमच्या पीएफची संपूर्ण रक्कम एटीएममधून काढू शकाल का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. दरम्यान, तुम्ही कार्डसारख्या एटीएमद्वारे तुमच्या भविष्य निर्वाह निधीच्या एकूण ठेव रकमेपैकी केवळ ५० टक्केच काढू शकाल. अशा प्रकारे तुम्ही एटीएममधून तुमच्या पीएफची संपूर्ण रक्कम काढू शकणार नाही.
खरंतर, ज्या सदस्यांचे सरासरी मासिक वेतन १५ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांना त्यांच्या पीएफ खात्यातून सात लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकते. याशिवाय, ज्यांचे मासिक सरासरी उत्पन्न १५ हजार रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांना एटीएममधून ५.५ लाख रुपये काढण्याची सुविधा दिली जाऊ शकते.
केंद्रीय कामगार सचिव सुमिता डावरा यांनी सांगितले की, मृत ईपीएफओ सदस्यांचे नॉमिनी देखील एटीएमद्वारे त्यांच्या एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (EDLI) दाव्याची रक्कम काढू शकतील. या विमा योजनेत नियोक्ते योगदान देतात.
याचबरोबर, एटीएममधून पीएफची रक्कम काढण्यासाठी एक समर्पित कार्ड जारी केले जाऊ शकते, असे म्हटले जाते. केंद्रीय कामगार सचिव सुमिता डावरा यांच्या म्हणण्यानुसार, यासाठी हार्डवेअर अपडेट केले जाईल. तसेच, नवीन प्रणाली आणली जाऊ शकते. ईपीएफओ सदस्यांना सध्या क्लेम सेटलमेंटसाठी ७ ते १० दिवस प्रतीक्षा करावी लागते.