Lokmat Money > बिझनेस न्यूज > पीएफची रक्कम मिळणार ‘मोबाइल’मध्ये! डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून रक्कमही काढता येणार

पीएफची रक्कम मिळणार ‘मोबाइल’मध्ये! डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून रक्कमही काढता येणार

कर्मचारी भविष्य निधीची (EPF) रक्कम काढण्यासाठी आगामी तीन महिन्यांत युनायटेड पेमेंट इंटरफेसची (UPI) सुविधा सुरू करण्याची तयारी कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं (EPFO) चालवली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 09:45 IST2025-02-21T09:44:02+5:302025-02-21T09:45:22+5:30

कर्मचारी भविष्य निधीची (EPF) रक्कम काढण्यासाठी आगामी तीन महिन्यांत युनायटेड पेमेंट इंटरफेसची (UPI) सुविधा सुरू करण्याची तयारी कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं (EPFO) चालवली आहे.

PF amount will be available in mobile Amount can also be withdrawn through digital wallet upi | पीएफची रक्कम मिळणार ‘मोबाइल’मध्ये! डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून रक्कमही काढता येणार

पीएफची रक्कम मिळणार ‘मोबाइल’मध्ये! डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून रक्कमही काढता येणार

कर्मचारी भविष्य निधीची (EPF) रक्कम काढण्यासाठी आगामी तीन महिन्यांत युनायटेड पेमेंट इंटरफेसची (UPI) सुविधा सुरू करण्याची तयारी कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं (EPFO) चालवली आहे. ही व्यवस्था उभी राहिल्यानंतर कर्मचारी डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून आपला ईपीएफ काढू शकतील.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘ईपीएफ’च्या दाव्यांचा निपटारा जलद गतीनं तसेच विना अडथळा व्हावा, यासाठी भारत सरकारनं काही सुधारणा हाती घेतल्या असून, त्याअंतर्गत यूपीआयद्वारा ईपीएफ काढण्याची सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. ईपीएफओनं एक योजनाही त्यासाठी तयार केली आहे. 

यूपीआय व्यवस्थेत ईपीएफओला समाविष्ट केल्यामुळे ईपीएफओची कार्यक्षमता तर वाढेलच; पण ७.४ दशलक्ष सदस्यांना ईपीएफओची रक्कम मिळण्यात सुलभता होईल. ईपीएफओ यूपीआयशी जोडून सरकार वित्तीय व्यवहार अधिक सुलभ आणि गतिमान करण्याचा प्रयत्न करीत आहे.

ईपीएफओने किती दावे निकाली काढले?

२०२४-२५ या वर्षात ईपीएफओनं ५ कोटी दावे निकाली काढले आहेत. याद्वारे २.०५ लाख कोटी रुपयांची रक्कम वितरित करणअयात आली. तर २०२३-२४ मध्ये ४.४५ कोटी दावे निकाली काढण्यात आले असून याद्वारे १.८२ लाख कोटी रुपये वितरित करण्यात आलेत.

आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ८.९५ लाख दावे प्रक्रिया करण्यात आले होते. त्यात पुढील वर्षी दुप्पट वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये तीन दिवसांच्या आत १८.७० लाख दावे प्रक्रिया करण्यात आले.

Web Title: PF amount will be available in mobile Amount can also be withdrawn through digital wallet upi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.