Lokmat Money > बिझनेस न्यूज > जेव्हा भारतातल्या एका व्यक्तीनं ८०४ रुपयांत खरेदी केलेलं google.com, बनलेला मालक; मग गुगलनं काय केलं?

जेव्हा भारतातल्या एका व्यक्तीनं ८०४ रुपयांत खरेदी केलेलं google.com, बनलेला मालक; मग गुगलनं काय केलं?

Google Domain: गुगलचा वापर केला नसेल किंवा त्याच्याबद्दल माहीत नसेल अशी कोणतीही व्यक्ती नसेल. पण गुगलबाबत एक जबरदस्त किस्सा घडला होता. ही गोष्ट २०१५ ची आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 10:22 IST2025-04-12T10:20:21+5:302025-04-12T10:22:16+5:30

Google Domain: गुगलचा वापर केला नसेल किंवा त्याच्याबद्दल माहीत नसेल अशी कोणतीही व्यक्ती नसेल. पण गुगलबाबत एक जबरदस्त किस्सा घडला होता. ही गोष्ट २०१५ ची आहे.

person from India bought google dot com for Rs 804 and became its owner what did Google do then | जेव्हा भारतातल्या एका व्यक्तीनं ८०४ रुपयांत खरेदी केलेलं google.com, बनलेला मालक; मग गुगलनं काय केलं?

जेव्हा भारतातल्या एका व्यक्तीनं ८०४ रुपयांत खरेदी केलेलं google.com, बनलेला मालक; मग गुगलनं काय केलं?

Google Domain: गुगलचा वापर केला नसेल किंवा त्याच्याबद्दल माहीत नसेल अशी कोणतीही व्यक्ती नसेल. पण गुगलबाबत एक जबरदस्त किस्सा घडला होता. ही गोष्ट २०१५ ची आहे. गुगलमध्ये काम करणारा भारतातील सन्मय वेद २९ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा गुगलवर सर्च करत होता. या शोधादरम्यान त्याने google.com डोमेन सर्च केलं आणि हे डोमेन उपलब्ध झालं. डोमेन उपलब्ध असलं तरी आपल्याला मिळणार नाही असं सन्मयला वाटलं. म्हणून त्यानं तसाच प्रयत्न केला आणि आपल्या क्रेडिट कार्डमधून १२ डॉलर म्हणजे ८०४ रुपये कापले. यानंतर google.com च्या नव्या मालकाचं नाव सन्मय वेद असे दिसू लागलं.

मात्र असं होणं शक्य नाही, कारण google.com. google.in gogle, goagle, gogle अशी डोमेन गुगलनं खरेदी करून ठेवलीयेत. याच्या नजीकची आणि दूरची सर्वच डोमेन गुगलकडे रजिस्टर आहेत. तांत्रिकरित्या नाही, परंतु एका तांत्रिक ग्लिचमुळे असं झालं असू शकतं. लवकरच गुगलला कोणीतरी google.com विकत घेतल्याचं दिसून आलं. तसंच याच्या मालकाचं नाव सन्मय वेद असं दिसू लागलं.

'या' सरकारी स्कीममध्ये मिळू शकते ३ कोटींपेक्षा अधिक रक्कम, केवळ 'इतक्या' गुंतवणूकीत होईल काम

या टेक्निकल ग्लिचची माहिती केल्याबद्दल गुगलनं सन्मयचं कौतुक केलं आणि बक्षीस म्हणून ६००६ डॉलर्स म्हणजेच जवळपास ४.०७ लाख रुपये दिले. परंतु जेव्हा सन्मय ही रक्कम भारतातील शाळेला देणार असल्याचं माहीत झालं तेव्हा त्यांनीही रक्कम दुप्पट केली. जेव्हा कोणी अशा प्रकारची तांत्रिक चूक दाखवतं तेव्हा गुगल अनेकदा त्या मोबदल्यात पैसे देतं. आता जर तुम्ही विचार करत असाल की जर सन्मयनं डोमेन देण्यास नकार दिला असता तर काय झालं असतं, जर असं झालं असतं तर कायदेशीर लढाई झाली असती आणि शेवटी गुगल जिंकलं असतं.

Web Title: person from India bought google dot com for Rs 804 and became its owner what did Google do then

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :googleगुगल