डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमचे (Paytm) संस्थापक विजय शेखर शर्मा यांची एक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याचं कारण आहे त्यांचं वाढदिवसाचे डिनर बिल, ज्यामध्ये त्यांनी ₹ ४०,८२८ च्या जेवणावर ₹ १६,२९० ची मोठी बचत केली. ही सवलत EazyDiner या डायनिंग प्लॅटफॉर्मच्या ऑफर आणि कूपनमुळे मिळाली. शर्मा यांनी केवळ याचा स्क्रीनशॉट शेअर केला नाही, तर त्यांचे मित्र पोस्टकार्ड हॉटेल आणि EazyDiner चे संस्थापक कपिल चोप्रा यांचे आभारही मानले.
शर्मा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर यासंदर्भातील एक पोस्ट शेअर केली. “₹ ४० हजार रुपयांचे बिल ₹ २४ हजार कसं झालं? फक्त यासाठी की तुमच्याकडे कपिल चोप्रा यांच्यासारखा मित्र आणि EazyDiner सारखं शानदार ॲप आहे!,” असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं.
शर्मांनी ₹ १६,२९० कसे वाचवले?
शर्मा यांनी जो बिलचा स्क्रीनशॉट शेअर केला, त्यानुसार कसं आहे कॅल्क्युलेशन :
रेस्टॉरंट डिस्काउंट (३५%): १४,२९० रुपये
कूपन डिस्काउंट (AMEXEDCENT): २००० रुपये
एकूण बचत: १६,२९० रुपये
लाईफटाईम बचत (अॅपवर): ४०,६३० रुपये
अंतिम बिल पेमेंट: २४,७३३ रुपये
It is too good to be true that a ₹40k restaurant bill becomes ₹24 k just because you have friend like @KapilChopra72 ‘s awesome and incredible @eazydiner ! 😄
— Vijay Shekhar Sharma (@vijayshekhar) November 22, 2025
Thank you EazyDiner , it is always awesome discounts on food 🤗🙏🏼 pic.twitter.com/XthhbM4NXM
EazyDiner काय आहे?
EazyDiner एक डायनिंग प्लॅटफॉर्म आहे, जो भारतातील हजारो रेस्टॉरंट्समध्ये सवलत, डील्स आणि मोफत टेबल बुकिंग यांसारखे फायदे मिळतात. EazyDiner प्राइम मेंबरशिपमुळे लोकांना २५ टक्क्यांपर्यंत सवलत, २X ईझी पॉइंट्ससारखे अनेक फायदे मिळतात.
EazyDiner प्राइम मेंबरशिप कशी मिळते?
ॲक्सिस बँकेनं आपल्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड ग्राहकांसाठी एक खास ऑफर लॉन्च केली आहे. आता बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डधारकांना EazyDiner प्राइम मेंबरशिप बिल्कुल मोफत मिळेल. सामान्य ॲक्सिस डेबिट आणि क्रेडिट कार्डधारकांना ३ महिन्यांची EazyDiner प्राइम मेंबरशिप मोफत देण्याची ऑफर मिळत आहे. तर, बर्गंडी, रिझर्व्ह आणि ॲक्सिस सॅमसंग को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड असलेल्या लोकांना पूर्ण १ वर्षाची मेंबरशिप दिली जात आहे.
