- उमेश शर्मा
(चार्टर्ड अकाउंटंट)
अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, ॲडव्हान्स टॅक्स म्हणजे काय? करदात्याला या महिन्यात काही ॲडव्हान्स टॅक्स भरावा लागेल का?
कृष्णा (काल्पनिक पात्र) : अर्जुन, ॲडव्हान्स टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स, जो वर्षाच्या शेवटी एकदाच मोठी रक्कम भरण्याऐवजी पूर्ण वर्षभरात विविध टप्प्यांमध्ये भरला जातो, त्याला ‘पे-ॲज-यू-अर्न’ टॅक्सदेखील म्हटले जाते. हा टॅक्स आयकर विभागाने ठरवलेल्या तारखांना ॲडव्हान्स भरावा लागतो. १५ जून २०२५ ही आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या ॲडव्हान्स टॅक्सच्या पहिल्या हप्त्याची देय तारीख आहे आणि करदात्यांना त्यांच्या एकूण अंदाजित टॅक्स रकमेच्या १५ टक्के इतका पहिला हप्ता भरणे आवश्यक आहे.
अर्जुन : कृष्णा, करदात्याने ॲडव्हान्स टॅक्सची रक्कम कशी ठरवावी?
कृष्णा : अर्जुन, पहिली पद्धत म्हणजे गेल्या वर्षाच्या एकूण टॅक्सवर ॲडव्हान्स टॅक्सची रक्कम मोजावी. उदाहरणार्थ, गेल्या वर्षाच्या एकूण टॅक्स रकमेच्या १५ टक्क्यांवरून पहिला हप्ता भरणे. दुसरी पद्धत म्हणजे चालू वर्षाचे अंदाजित एकूण उत्पन्न मोजून त्या उत्पन्नावर टॅक्स ठरवून त्याच्या १५ टक्के ॲडव्हान्स टॅक्स भरणे. गेल्या वर्षाच्या टॅक्सवर आधारित पहिली पद्धत चालू वर्षासाठी योग्य नाही; कारण इंडिव्हिज्युअल आणि ‘एचयूएफ’साठी स्लॅब दरात मोठे बदल झाले आहेत.
अर्जुन : कृष्णा, कोणाला ॲडव्हान्स टॅक्स भरण्याची आवश्यकता नाही?
कृष्णा : अर्जुन, खालील व्यक्तींना ॲडव्हान्स टॅक्स भरण्याची आवश्यकता नाही.
१. जर व्यक्तीचे एकूण वार्षिक उत्पन्न
₹ १०,००० पेक्षा कमी असेल.
२. ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना, जर त्यांना व्यावसायिक उत्पन्न नसेल.
३. ज्या व्यक्ती ‘प्रिझम्टिव्ह टॅक्स प्रणाली’ वापरून टॅक्स भरतात, त्यांना एकूण टॅक्स रक्कम १५ मार्चपर्यंत एकाच हप्त्यात भरावी लागते.
ॲडव्हान्स टॅक्स भरताय? आधी हे जाणून घ्या..
Advance Tax: ॲडव्हान्स टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स, जो वर्षाच्या शेवटी एकदाच मोठी रक्कम भरण्याऐवजी पूर्ण वर्षभरात विविध टप्प्यांमध्ये भरला जातो, त्याला ‘पे-ॲज-यू-अर्न’ टॅक्सदेखील म्हटले जाते. हा टॅक्स आयकर विभागाने ठरवलेल्या तारखांना ॲडव्हान्स भरावा लागतो.
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 09:17 IST2025-06-09T09:16:27+5:302025-06-09T09:17:21+5:30
Advance Tax: ॲडव्हान्स टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स, जो वर्षाच्या शेवटी एकदाच मोठी रक्कम भरण्याऐवजी पूर्ण वर्षभरात विविध टप्प्यांमध्ये भरला जातो, त्याला ‘पे-ॲज-यू-अर्न’ टॅक्सदेखील म्हटले जाते. हा टॅक्स आयकर विभागाने ठरवलेल्या तारखांना ॲडव्हान्स भरावा लागतो.
