Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पावनगाव तीन वर्षांपासून दत्तक

पावनगाव तीन वर्षांपासून दत्तक

व्हीएमव्ही वाणिज्य, जेएमटी कला आणि जेजेपी विज्ञान महाविद्यालयाने पावनगाव तीन वर्षांपासून दत्तक घेतले असून राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय शिबिर याच गावात आयोजित करण्यात आ

By admin | Updated: December 20, 2014 08:38 IST2014-12-19T22:57:01+5:302014-12-20T08:38:22+5:30

व्हीएमव्ही वाणिज्य, जेएमटी कला आणि जेजेपी विज्ञान महाविद्यालयाने पावनगाव तीन वर्षांपासून दत्तक घेतले असून राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय शिबिर याच गावात आयोजित करण्यात आ

Pavanogan adopted for three years | पावनगाव तीन वर्षांपासून दत्तक

पावनगाव तीन वर्षांपासून दत्तक

राष्ट्रीय सेवा योजना शिबिर
नागपूर : व्हीएमव्ही वाणिज्य, जेएमटी कला आणि जेजेपी विज्ञान महाविद्यालयाने पावनगाव तीन वर्षांपासून दत्तक घेतले असून राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय शिबिर याच गावात आयोजित करण्यात आले. उद्घाटन प्रमुख अतिथी डॉ. रूपाताई कुळकर्णी यांच्या हस्ते नुकतेच झाले. मंचावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर.डी. मेहता, पावनगावचे सरपंच रामचंद्र रेवाडे, जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती कंदिकुरवार, समितीचे समन्वयक प्रा. अविनाश अवचट उपस्थित होते. कुळकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजनेत सहभागी झाल्यावर आपल्या कामाप्रती प्रामाणिक राहण्याची वृत्ती प्रत्येक विद्यार्थ्याने बाळगून सक्रियतेने समाजकार्य करावे, असा संदेश त्यांनी दिला. रेवाडे यांनी महाविद्यालयाचे आभार मानून वेळोवेळी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मेहता यांनी सांगितले की, महाविद्यालयाने पावनगाव तीन वर्षांसाठी दत्तक घेतले असून गावाच्या स्वच्छता सुधारणेविषयी आम्ही नेहमीच तत्पर आहे. प्रास्तविक समितीचे समन्वयक प्रा. अविनाश अवचट यांनी केले. संचालन डॉ. राखी जाधव यांनी तर श्रृतिका बुरडकर यांनी आभार मानले. यावेळी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षक, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Pavanogan adopted for three years