Visa Free Countries for Indians: प्रवासाची आवड असलेल्या लोकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२५ नुसार भारतीयांना आता व्हिसाशिवाय ५९ देशांमध्ये प्रवास करता येणार आहे. त्याचबरोबर जागतिक पातळीवरही भारताच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. जागतिक क्रमवारीत भारतीय पासपोर्टनं गेल्या वर्षी ८५ वा क्रमांक मिळवला होता, जो यंदा ७७ व्या स्थानावर पोहोचला आहे. म्हणजेच भारतीय पासपोर्टनं रँकिंगमध्ये आठ स्थानांची झेप घेतलीये. ही भारतासाठी एका मोठ्या यशापेक्षा कमी नाही. आता अनेक देशांमध्ये व्हिसाशिवाय जाणं सोपं झालंय. कोणत्याही व्हिसा फ्री देशात जाण्यापूर्वी भारतीय नागरिकांना तेथील नियमांची माहिती असणं आवश्यक आहे. जेणेकरून त्यांचा प्रवास अधिक आरामदायी आणि सोयीस्कर होऊ शकेल.
भारतीय पासपोर्टची ताकद वाढतेय
हेनले पासपोर्ट निर्देशांक इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या आकडेवारीवर आधारित आहे. ज्यामध्ये पासपोर्टच्या ताकदीच्या आधारे देशाला नंबर दिला जातो. भारतीय पासपोर्टची वाढती ताकद केवळ जागतिक परिणामच नव्हे, तर इतर देशांशी राजनैतिक संबंध दृढ होण्याचंही द्योतक आहे.
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
५९ व्हिसा फ्री देशांची यादी
व्हिसा फ्री देश: अंगोला, बार्बाडोस, भूतान, ब्रिटिश व्हर्जिन बेटं, कुक बेटं, डोमिनिका, फिजी, ग्रेनाडा, हैती, इराण, जमैका, कझाकस्तान, केनिया, किरिबाटी, मकाओ, मादागास्कर, मलेशिया, मॉरिशस, मायक्रोनेशिया, मोंटसेराट, नेपाळ, नियू, फिलीपिन्स, रवांडा, सेनेगल, सेंट किट्स अँड नेव्हिस, सेंट व्हिन्सेंट अँड ग्रेनेडाइन्स, थायलंड, त्रिनिदाद आणि टोबॅगो, वानुआटु.
व्हिसा ऑन अरायव्हल
बोलिव्हिया, बुरुंडी, कंबोडिया, केप व्हर्डे बेटं, कोमोरोस बेटं, जिबूती, इथिओपिया, गिनी-बिसाऊ, इंडोनेशिया, जॉर्डन, लाओस, मालदीव, मार्शल बेटं, मंगोलिया, मोझांबिक, म्यानमार, नामिबिया, पलाऊ बेटं, कतार, सामोआ, सिएरा लिओन, सोमालिया, श्रीलंका, सेंट लुसिया.
ईटीए
जर तुम्हीही या देशांमध्ये फिरायला जात असाल तर त्या देशांशी संबंधित नियम नक्कीच जाणून घ्या. आवश्यक कागदपत्रांची माहिती मिळवा. तुमच्या पासपोर्टची वैधता देखील तपासा कारण अनेक देशांमध्ये प्रवेश करण्यासाठी पासपोर्ट किमान ६ महिन्यांसाठी वैध असणे आवश्यक आहे.