ऑफिसमध्ये परत येण्याचा आदेश जारी होताच एका अमेरिकन कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली. घरून काम करण्याची सवय असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी पाच दिवस ऑफिसमध्ये येण्याऐवजी नोकरी सोडण्याचा पर्याय निवडला. याचा परिणाम असा झाला की, एका झटक्यात ६०० कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडली आणि कंपनीला १८५ मिलियन डॉलर्सचं (सुमारे १,५३५ कोटी रुपये) नुकसान झालं.
अमेरिकेची एन्टरटेन्मेंट कंपनी पॅरामाउंट स्कायडांस (Paramount Skydance) मध्ये, सीईओनं आठवड्यातून ५ दिवस सर्वांना ऑफिसमध्ये परत येण्याचा आदेश दिल्यावर ६०० कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली. या निर्णयामुळे कंपनीवर १,५३५ कोटींच्या सेव्हरन्स खर्चाचा बोजा पडला. कंपनीला तेव्हा मोठा झटका बसला, जेव्हा तिच्या सुमारे ६०० कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी नोकरी सोडली. याचं कारण होते कंपनीचे कठोर रिटर्न टू ऑफिस (RTO) धोरण. या निर्णयामुळे कंपनीला कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं.
कंपनीने दिले २ पर्याय
फॉर्च्यूनच्या रिपोर्टनुसार, पॅरामाउंट अँड स्कायडांस मीडियाच्या ८ अब्ज डॉलरच्या विलीनीकरणानंतर (Merger), ऑगस्ट २०२५ मध्ये चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर डेव्हिड एलिसन यांनी कठोर रिटर्न टू ऑफिस पॉलिसी लागू केली.
त्यांनी सांगितलं की, सर्व कर्मचाऱ्यांनी एकतर पूर्णवेळ ऑफिसमधून काम करावं किंवा कंपनीची बायआऊट ऑफर स्वीकारावी, म्हणजेच ते नोकरी सोडून एक निश्चित रक्कम घेऊन जाऊ शकतात.
खर्चाचा मोठा बोजा
कंपनीच्या फाइलिंगनुसार, लॉस एंजेलिस आणि न्यूयॉर्क ऑफिसमधील व्हीपी स्तरावरील आणि त्याखालील सुमारे ६०० कर्मचाऱ्यांनी ही ऑफर स्वीकारली. यामुळे कंपनीवर १८५ मिलियन डॉलर्सच्या ($185 Million) सेव्हरन्स खर्चाचा बोजा पडला.
एलिसन यांनी त्यांच्या मेमोमध्ये सांगितलं की, समोरासमोर काम केल्याने टीमवर्क, आयडिया शेअरिंग आणि शिकण्याचं वातावरण मजबूत होते, जे व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवर शक्य नाही. जानकारांच्या मते, हे पाऊल कंपनीच्या रिस्ट्रक्चरिंग स्ट्रॅटजीचा भाग आहे. कंपनीनं भागधारकांना पाठवलेल्या पत्रात म्हटलंय की, तिला एकूण १.७ अब्ज डॉलर पर्यंतच्या री-स्ट्रक्चरिंग खर्चाची अपेक्षा आहे.
