Paradeep Parivahan IPO: एंड टू एंड लॉजिस्टिक सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी परादीप परिवहनचा आयपीओ (IPO) लवकरच येण्याच्या तयारीत आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी ४५ कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. सोमवार, १७ मार्चपासून सुरू होणाऱ्या या इश्यूची किंमत ९३ ते ९८ रुपये प्रति शेअर ठेवण्यात आलीये. हा आयपीओ १९ मार्च रोजी गुंतवणूकीसाठी बंद होईल.
आयपीओच्या डिटेल्स
बीएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर लिस्ट होणाऱ्या या आयपीओमध्ये ४५.७८ लाख शेअर्सचा समावेश आहे. आयपीओमधून मिळणारी रक्कम वर्किंग कॅपिटल आणि सामान्य कॉर्पोरेट खर्चासाठी वापरली जाईल. रजिस्ट्रार ऑफ शेअर इंडिया कॅपिटल सर्व्हिसेस आणि बिगशेअर सर्व्हिसेस हे या इश्यूचे प्रमुख रजिस्ट्रार आहेत.
कंपनीचे एमडी काय म्हणाले?
परादीप परिवहनचे व्यवस्थापकीय संचालक खालिद खान यांनी, आयपीओमधून जमा झालेल्या पैशांमुळे केवळ कार्यशील भांडवल मजबूत होणार नाही तर, क्षमता वाढविणं, नाविन्यपूर्ण क्षेत्रात गुंतवणूक करणं आणि सेवा ऑफर्स वाढविणे शक्य होणार असल्याचं म्हटलं.
कंपनीची आर्थिक स्थिती
आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीला २११ कोटी रुपयांचा महसूल, ३४ कोटींचा एबिटा आणि १५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला. गेल्या वर्षी सप्टेंबरपर्यंत कंपनीचं उत्पन्न १३७ कोटी रुपये, एबिटा १३ कोटी रुपये आणि निव्वळ नफा ५ कोटी रुपये होता.
२५ वर्षे जुनी कंपनी
परादीप परिवहन लिमिटेडची स्थापना २००० मध्ये झाली. त्याचा उद्देश प्रामुख्यानं कार्गो हँडलिंग, पोर्ट ऑपरेशन, इंटरपोर्ट ट्रान्सपोर्ट, आयात कार्गोची हाताळणी इत्यादींशी संबंधित आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)