Pakistan Stock Market: पाकिस्तानच्याशेअर बाजारात सध्या पैशाचा ओघ सुरू आहे. वास्तविक, पाकिस्तानचाशेअर बाजार सध्या इतका तेजीत आहे की त्यान भारताला मागे टाकलं आहे. या तेजीमध्ये किरकोळ गुंतवणूकदार महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. अनेक वर्षांच्या गोंधळानंतर आणि राजकीय अनिश्चिततेनंतर प्रथमच स्थानिक शेअर बाजार इतका आत्मविश्वास दर्शवित आहे.
२०२५ मध्ये, पाकिस्तानचा बेंचमार्क कराची स्टॉक एक्सचेंज (KSE-100 इंडेक्स) सुमारे ४०% वर चढला आहे. हा आशिया खंडातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या बाजारपेठांपैकी एक बनला आहे. ब्लूमबर्गच्या मते, सरकारचं स्थैर्य आणि चांगल्या नफ्याच्या अपेक्षांमुळेही लोक शेअर बाजाराकडे आकर्षित झाले आहेत, जे सहसा जोखीम टाळतात. मालमत्तेच्या किंमती स्थिर झाल्या आहेत आणि गेल्या दोन वर्षांत मुदत ठेवींवरील व्याज निम्म्यानं कमी झाले आहे. अशा परिस्थितीत सामान्य गुंतवणूकदार इतर गुंतवणूक पर्यायांऐवजी इक्विटी म्हणजेच शेअर बाजारात पैसे गुंतवत आहेत.
रशियाचं भारतप्रेम वाढलं! कच्चं तेल-गॅसनंतर आता दिली 'ही' मोठी ऑफर; अमेरिकेला लागणार झटका?
हे इतके वेगवान का आहे?
टॉपलाइन सिक्युरिटीज लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहम्मद सोहेल म्हणतात की, लिक्विडिटीमुळे सध्या बाजार तेजीत आहे. जर हा पैसा इतरत्र गेला नाही तर बाजार मजबूत राहील.
फिच रेटिंग्जनं रेटिंग वाढवल
२०२३ मध्ये पाकिस्तानची अर्थव्यवस्था कर्जाच्या गर्तेत बुडाली होती, परंतु आता ती हळूहळू रुळावर येत आहे. छोटे गुंतवणूकदार देशांतर्गत शेअर्समध्ये गुंतवणूक करत आहेत. एसअँडपी ग्लोबल रेटिंग्ज आणि फिच रेटिंग्ज सारख्या संस्थांनी यावर्षी देशाचं रेटिंग वाढवलंय.
ट्रेडिंगमध्ये प्रचंड तेजी
टॉपलाइन सिक्युरिटीजच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरच्या तिमाहीत पाकिस्तानमध्ये सुमारे ३६,००० नवीन ट्रेडिंग खाती उघडली गेली. गेल्या तीन महिन्यांतील २३,६०० नवीन नोंदणीपेक्षा ही संख्या अधिक आहे. ट्रेडिंगमध्येही प्रचंड तेजी आली आहे. ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, पाकिस्तान स्टॉक एक्सचेंजनं दररोज २०० दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त व्यापार केला, जो २०१७ नंतरचा सर्वाधिक आहे.
मोठी घटना बाजाराचा मूड खराब करेल
पाकिस्तानातील महागाईमुळे शेअर बाजाराची ही चांगली चाल बिघडू शकते. ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्सने अंदाज वर्तविला आहे की किंमती आणखी वाढतील. ऑक्टोबरमध्ये महागाई अपेक्षेपेक्षा जास्त वाढली, ज्यामुळे केंद्रीय बँकेला जूनपूर्वी व्याज दर कमी करण्यापासून रोखलं जाऊ शकते. भारत आणि अफगाणिस्तानशी नुकत्याच झालेल्या भू-राजकीय तणावानंतर कोणतीही मोठी घटना बाजाराचा मूड खराब करू शकते.
परदेशी गुंतवणूकदार बाहेर पडताहेत
दरम्यान, परदेशी गुंतवणूकदार या तेजीतून बाहेर पडताना दिसत आहेत. २०२५ मध्ये आतापर्यंत परदेशी फंडांनी स्थानिक स्टॉकमध्ये ३०८ मिलियन डॉलर्सची विक्री केली आहे. २०१८ नंतरची ही सर्वात मोठी रक्कम आहे.
पाकिस्तानच्या शेअर्समध्ये सुमारे एक तृतीयांश गुंतवणूक करणारे मार्टिनसन म्हणतात, "येथून पुढे जाण्यासाठी, तुम्हाला अशी अपेक्षा करावी लागेल की पुढील १० वर्षे पाकिस्तानसाठी गेल्या १० वर्षांच्या तुलनेत चांगली असतील." ते पुढे म्हणाले, "आम्ही पाकिस्तानमध्ये आणखी वाढ पाहू शकतो, परंतु गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ती हळू असू शकते." '
भारताचं स्थान काय आहे?
पाकिस्तानचा केएसई-१०० निर्देशांक यावर्षी सुमारे ४० टक्क्यांनी वाढला आहे, तर भारतीय शेअर बाजाराची स्थिती तुलनेनं वाईट आहे. यंदा सेन्सेक्समध्ये ८.५० टक्के वाढ झाली आहे. त्याच वेळी, निफ्टी ५० ची स्थितीही फारशी चांगली नाही. निफ्टी ५० मध्ये यावर्षी सुमारे १० टक्क्यांची वाढ झाली आहे.
