Pakistan Stock Exchange: काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान स्टॉक एक्स्चेंज पोर्टलची वेबसाइट सध्या बंद करण्यात आली आहे. बुधवारी आणि गुरुवारी पाकिस्तान स्टॉक एक्स्चेंजमध्ये (PSX) मोठी घसरण नोंदवण्यात आली. पीएसएक्समध्ये तीन दिवसांत जवळपास ४००० अंकांची घसरण झाली आहे. पाकिस्तानचा शेअर बाजार बुधवारी १२०० अंकांनी तर गुरुवारी २५०० अंकांनी कोसळला. यानंतर शुक्रवारी पाकिस्तानच्या शेअर बाजारात ४०० अंकांची घसरण पाहायला मिळाली. पाकिस्तानच्या स्टॉक एक्स्चेंजवर व्यवहार सुरू आहेत, पण भारतासाठी हे पोर्टल बंद करण्यात आलंय.
सोशल मीडिया युजर्सनं केलं ट्रोल
पाकिस्तानी स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट बंद झाल्यानंतर सोशल मीडिया युजर्स एक्सवर आपली प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने सांगितले की, शेअर विक्री थांबवण्याचा चांगला मार्ग आहे. तर आणखी एका युजरनं लिहिलं की, पाकिस्तानमध्ये स्टॉक एक्स्चेंज देखील आहे? आणखी एका युजरने लिहिलंय "पाकिस्तान स्टॉक एक्स्चेंज आम्हाला काहीतरी सांगत आहे. पाकिस्तान स्टॉक एक्स्चेंजबद्दल काय म्हणाल? तो टाईम बॉम्बसारखा वाटतो. आणखी एका युजरन पाकिस्तान स्टॉक एक्स्चेंजची वेबसाइट हॅक झाली का असा सवाल केलाय.
Does Pakistan even have a stock exchange 😱 pic.twitter.com/xxJ3j5IQCV
— Flying Dutchman (@FlyingD85) April 25, 2025
mean while pakistan stock exchange #nifty#banknifty😀 pic.twitter.com/QrDYx604Hv
— Dr kiran (@kiranjakka) April 25, 2025
Pakistan stock exchange website hacked? pic.twitter.com/Z5wpIem9a3
— Kaushhik Maall (@RegeWolf) April 24, 2025
पाकिस्तानचा जीडीपी मंदावणार
अलीकडेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) आर्थिक जोखीम आणि सततच्या बाह्य असुरक्षिततेचे कारण देत आर्थिक वर्ष २०२५ साठी पाकिस्तानचा जीडीपी वाढीचा अंदाज २.६ टक्क्यांवर आणला आहे. आशियाई विकास बँकेने (एडीबी) पाकिस्तानचा २०२५ चा जीडीपी वाढीचा अंदाज डिसेंबर २०२४ मधील ३ टक्क्यांवरून २.५ टक्क्यांवर आणला आहे. हे दोन्ही अंदाज पाकिस्तान सरकारने या आर्थिक वर्षासाठी निर्धारित केलेल्या ३.६ टक्के वाढीच्या उद्दिष्टापेक्षा कमी आहेत.
सातत्यानं घसरण
कराची-१०० निर्देशांक (केएसई-१००) गुरुवारी व्यवहाराच्या पहिल्या पाच मिनिटांत दोन टक्क्यांहून अधिक किंवा २,५०० अंकांनी घसरून १,१४,७४०.२९ वर बंद झाला. निर्देशांकानं काही प्रमाणात घसरण भरून काढली असली तरी दुपारी तीन वाजता निर्देशांक १,५३२.४२ अंकांनी म्हणजेच १.३१ टक्क्यांनी घसरून १,१५,६९३.७२ वर व्यवहार करत होता. कराची १०० निर्देशांक शुक्रवारी ४०० अंकांनी घसरून १,१४,७९६.३१ वर बंद झाला.