Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानसोबतचे व्यापारी संबंध तोडले आहेत. यानंतर पाकिस्तानातील व्यापाऱ्यांना नवी बाजारपेठ शोधावी लागत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 10:24 IST2025-06-21T10:15:01+5:302025-06-21T10:24:42+5:30

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानसोबतचे व्यापारी संबंध तोडले आहेत. यानंतर पाकिस्तानातील व्यापाऱ्यांना नवी बाजारपेठ शोधावी लागत आहे.

Pakistan is the world s largest producer of rock salt India rejected it and is now knocking on the doors of other countries | आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानंपाकिस्तानसोबतचे व्यापारी संबंध तोडले आहेत. यानंतर पाकिस्तानातील सैंधव मीठ व्यापाऱ्यांना नवी बाजारपेठ शोधावी लागत आहे. त्यांना आता सैधव मीठाच्या विक्रीसाठी इकडे तिकडे पळावं लागत आहे. भारत पाकिस्तानकडून 'हिमालयन पिंक सॉल्ट' नावाच्या सैंधव मीठाचा मोठा खरेदीदार होता. पाकिस्तान आता अमेरिका, चीन आणि व्हिएतनाम सारख्या देशांना निर्यात वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्ताननं २०२४ मध्ये ३,५०,००० टन सैंधव मीठ निर्यात केलंय. याची किंमत सुमारे १२ कोटी डॉलर आहे.

भारतानं व्यापार बंद केल्यानं पाकिस्तानच्या सैधव मीठाच्या व्यापारावर परिणाम झालाय. पाकिस्तान हा जगातील सर्वात मोठा सैधव मीठ उत्पादक आणि निर्यातदार देश आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील खेवरामध्य सैंधव मीठाची सर्वात मोठी खाण आहे. तसेच या ठिकाणी ३० प्रोसेसिंग युनिट आहेत.

भारत होता सर्वाधिक आयात करणारा देश

पाकिस्तानातील सैंधव मीठ आणि संबंधित उत्पादनांची निर्यात करणाऱ्या गनी इंटरनॅशनलचे वरिष्ठ संचालक मन्सूर अहमद यांनी याबाबत माहिती दिली. भारत हा पाकिस्तानातून सैंधव मीठाचा सर्वात मोठा आयातदार देश होता. निर्बधांचा अर्थ म्हणजे त्या देशाला आता निर्यात होत नाही, असं ते म्हणाले. भारतीय आयातदार अनेक वर्षांपासून पाकिस्तानकडून कच्चे सैंधव मीठ खरेदी करत होते. त्यानंतर ते त्यावर प्रक्रिया करून पॅकिंग करायचे आणि भारतीय उत्पादन म्हणून इतर देशांना चढ्या किमतीत विकायचे, असंही ते म्हणाले.

अन्य बाजारांत निर्यातीचा प्रयत्न

आता पाकिस्तानचे निर्यातदार या बंदीला पर्याय शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पाकिस्तानच्या सॉल्ट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (SMAP) प्रमुख सायमा अख्तर म्हणतात की, पाकिस्तानी रॉक सॉल्टला जगभरात मोठी मागणी आहे. लोकांचा असा विश्वास आहे की त्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. जेव्हा भारतात मीठ विकलं जात होतं तेव्हा ते तिथे ४५ ते ५० रुपये प्रति किलोनं विकलं जात होतं. आता ते ७० ते ८० रुपये प्रति किलोनं विकले जात आहे.

आम्ही आता अमेरिका, व्हिएतनाम, चीन, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, तुर्कस्तान, नेदरलँड्स, इटली, यूके, जर्मनी, ब्राझील, यूएई, जपान, सिंगापूर, चिली, दक्षिण आफ्रिका, रशिया येथे निर्यात वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. हे सर्व रॉक सॉल्टचे मोठे खरेदीदार आहेत, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानमधील रॉक सॉल्टचे प्रमुख उत्पादक आणि निर्यातदार असलेल्या इत्तेफाक कंपनीचे सीईओ शहजाद जावेद यांनी दिली.

Web Title: Pakistan is the world s largest producer of rock salt India rejected it and is now knocking on the doors of other countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.