Dividend Stock: तुम्ही टूथपेस्ट उत्पादक कंपनी कोलगेट पामोलिव्ह इंडियामध्ये (Colgate Palmolive India) गुंतवणूक केली असेल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कंपनीने तिच्या भागधारकांसाठी लाभांश जाहीर केला आहे. अलीकडेच कंपनीने 2026 आर्थिक वर्षासाठी दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. या कालावधीत कंपनीने तिच्या भागधारकांसाठी 2400% लाभांश(Dividend) आणि लाभांशासाठी रेकॉर्ड डेट जाहीर केली.
रेकॉर्ड डेट कधी आहे ते जाणून घ्या?
कोलगेट टूथपेस्टची मूळ कंपनी, कोलगेट-पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेड, 2025-26 आर्थिक वर्षासाठी पहिला लाभांश जाहीर करत आहे. या अंतर्गत, कंपनीने ₹1 च्या प्रति इक्विटी शेअरसाठी ₹24 लाभांश जाहीर केला आहे. हा फायदा फक्त अशा भागधारकांनाच उपलब्ध असेल, ज्यांची नावे कंपनीच्या सदस्यांच्या नोंदणीमध्ये किंवा डिपॉझिटरीजमध्ये 3 नोव्हेंबरपर्यंत नोंदणीकृत असतील.
कंपनीच्या आर्थिक कामगिरीची झलक
या लाभांशासाठी कंपनी तब्बल ₹652 कोटी रुपये खर्च करणार आहे. पेमेंट 19 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होतील. दरम्यान, कंपनीची दुसऱ्या तिमाहीत निव्वळ विक्री ₹1,507 कोटी होती, जी मागील तिमाहीतील ₹1,421 कोटींपेक्षा 6% जास्त आहे. नेट प्रॉफिट ₹328 कोटी राहिले, जे मागील वर्षाच्या ₹395 कोटींपेक्षा कमी आहे.
डिविडेंडचा इतिहास
कोलगेट-पामोलिवने मागील काही वर्षांत सातत्याने मोठे लाभांश वाटप केले आहे.
मे 2025- ₹27 प्रति शेअर
नोव्हेंबर 2024 - ₹24 प्रति शेअर
मे 2024- ₹26 प्रति शेअर
नोव्हेंबर 2023- ₹22 प्रति शेअर
तसेच मे 2024 मध्ये ₹10 प्रति शेअरचा लाभांश दिला होता.
शेअर बाजारातील हालचाल
तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर शुक्रवारी सकाळच्या व्यवहारात शेअरमध्ये 3.8% घसरण झाली. NSE वर शेअरचा दर ₹2200 पर्यंत घसरला.
(टीप- शेअर बाजारातगुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)
