lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > दिवाळी सेलचा ऑनलाइन धमाका; किती फायद्याचा, किती तोट्याचा!

दिवाळी सेलचा ऑनलाइन धमाका; किती फायद्याचा, किती तोट्याचा!

सणासुदीच्या काळात देण्यात येणाऱ्या बंपर ऑफर्समुळे ग्राहकांनी ई-कॉमर्स कंपन्याना जास्त पसंती दिली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 01:37 PM2019-10-14T13:37:15+5:302019-10-14T14:08:10+5:30

सणासुदीच्या काळात देण्यात येणाऱ्या बंपर ऑफर्समुळे ग्राहकांनी ई-कॉमर्स कंपन्याना जास्त पसंती दिली आहे.

Online sale; Advantages and Disadvantages of Online Shopping | दिवाळी सेलचा ऑनलाइन धमाका; किती फायद्याचा, किती तोट्याचा!

दिवाळी सेलचा ऑनलाइन धमाका; किती फायद्याचा, किती तोट्याचा!

ऑनलाइन शॉपिंग सध्या अनेकांच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग बनला आहे. कोणत्याही वस्तूची शॉपिंग करायची म्हटल्यावर सर्रास आजकाल प्रत्येक जण ऑनलाइन शॉपिंगचा पर्याय स्वीकारतो. घरगुती वापरातील वस्तूंपासून ते कपडे, गॅजेट, शूज, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे अशा विविध प्रकारच्या कोणत्याही वस्तू थेट ऑनलाइन मागविल्या जातात. मग ती वस्तू छोटी असो वा मोठी. भारतात ऑनलाइन शॉपिंगकडे ग्राहकांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र ही शॉपिंग केवळ नवीन वस्तूंसाठीच असते असे नाही, तर जुन्या वस्तूही ऑनलाइन शॉपिंग करण्याचे प्रमाण लक्षणीय आहे, अशा खरेदीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

हल्ली सर्वजण टेक्नॉलॉजीच्या कोणत्या-ना-कोणत्या कारणाने संपर्कात येत असतातच. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीजवळ इंटरनेट असतेच. मग स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कॉम्प्युटर यांच्या माध्यमातून इंटरनेटचा लहानापासून ते मोठ्यापर्यंत सरासरी वापर होतोच. त्यामुळे अनेक ग्राहकांचा कल हा ऑनलाइन शॉपिंगकडे वळला आहे. शॉपिंगला ग्राहकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याने इंटरनेटच्या या महाजाळ्यात अनेक ई-कॉमर्स साइट्स किंवा अनेक कंपन्या या व्यवसायात उतरल्या आहेत. 

ई-कॉमर्स कंपन्यांनी तर आपली एक प्रकारची दुकानदारीच सुरु केली आहे. या दुकानदारीत फ्लिपकार्ट, स्नॅपडील, ओला कॅब्स, इनमोबी, इबे, म्यानत्रा, जबाँग अशा अनेक कंपन्यांनी आपल्या साइट्सच्या माध्यमातून इंटरनेटवर बाजार मांडला आहे. या साइट्सवर कपडे, गॅजेट, शूज, उपकरणे आणि काही घरगुती वस्तूंची शॉपिंग करता येते. याचबरोबर शॉपिंगची पद्धत अगदी सोपी आणि सोयीस्कर असल्याने प्रत्येक ग्राहकाला घरी बसून शॉपिंग करणे शक्य झाले आहे.

याशिवाय, नेहमी भरघोस डिस्काउंट तसेच सणासुदीच्या काळात देण्यात येणाऱ्या बंपर ऑफर्समुळे ग्राहकांनी ई-कॉमर्स कंपन्याना जास्त पसंती दिली आहे. यातच दिवाळी सणानिमित्त अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टने ग्राहकांसाठी बंपर सेल आणला आहे. अॅमेझॉनने 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' सेल 13 ते 17 ऑक्टोबरपर्यंत आयोजित केला आहे. तर फ्लिपकार्टनेही 12 ते 16 ऑक्टोबरपर्यंत 'बिग दिवाळी सेल' आणला आहे.  

ऑनलाइन शॉपिंगचे फायदे...

वेळेची बचत - एखाद्या वस्तूची शॉपिंग करण्यासाठी मार्केटमध्ये गेलात तर दिवसातील काही वेळ हा मार्केटमध्येच वाया जातो. ऑनलाइन शॉपिंगमुळे हा फुकटचा वाया जाणारा वेळ वाचवता येतो.

घरपोच सुविधा/इंधनाची बचत - मार्केटमध्ये शॉपिंग करणासाठी जाताना वाहने वापरणाºया ग्राहकांना ऑनलाइन शॉपिंग खूप सोयीची झाली आहे. ऑनलाइन शॉपिंग केलेली वस्तू घरपोच डिलिव्हरी होत असल्यामुळे वाहनधारक ग्राहकांना इंधनाची बचत करता येते.

एनर्जी बचत - शॉपिंगसाठी गेलात आणि एखादी वस्तू त्या ठिकाणी मिळाली नाही, तर दुस-या ठिकाणी शोधावी लागते. यासाठी पुरेसी एनर्जी लागते. ऑनलाइन शॉपिंगमुळे ही एनर्जी बचत करता येते.

किमतीची तुलना - ऑनलाइन शॉपिंग करताना जास्तकरून वस्तूंच्या किमती विचारात घेतल्या जातात. एखाद्या वस्तूची किंमत संशयास्पद वाटल्यास इतर ऑनलाइन शॉपिंगच्या इतर साइट्स पाहून योग्य किंमत ठरविता येते.

24/7 उपलब्धता - ऑनलाइन शॉपिंग करताना वेळेचे कोणतेही बंधन नाही. काही साइट्सचा अपवाद वगळता. 24/7 ऑनलाइन शॉपिंग करता येते.

रांगेत उभे राहण्याचा त्रास नाही - मार्केटमध्ये काही वस्तूंची शॉपिंग करण्यासाछी रांगेत उभारावे लागते. मात्र हा त्रास ऑनलाइन शॉपिंग करताना टाळता येतो.

वस्तू शोधण्याची सोपी पद्धत - एखादी वस्तू ऑनलाइन शोधताना साइट्सवर अगदी सोपे पर्याय दिले आहेत.

पैसे भरण्याची सोय - ऑनलाइन शॉपिंग केल्यानंतर त्या वस्तूचे पैसे अदा करण्याची पद्धत सोयीस्कर करण्यात आली आहे. एक म्हणजे वस्तू घरपोच आल्यानंतरच पैसे देता येतात (कॅश ऑन डिलिव्हरी). आणि दुसरे तुमच्याजवळ क्रेडिट किंवा डेबिट कार्ड असेल तर त्यानुसार तुम्हाला पैसे भरता येतात.

वेगवेगळ्या ऑफर्स - सणासुदीच्या काळात अनेक साइट्स या वस्तूंची विक्री होण्यासाठी आणि ग्राहकांना आपल्याकडे ओढण्यासाठी अनेक ऑफर्स ठेवत असतात.

ऑनलाइन शॉपिंगचे तोटे...

वस्तू प्रत्यक्ष पाहता येत नाही - मार्केटमध्ये दुकानात जाऊन एखाद्या वस्तूची शॉपिंग करताना आपल्याला प्रत्यक्षरीत्या पाहता येते. मात्र ऑनलाइन शॉपिंग करताना त्या वस्तूची फक्त इमेज दाखविली जाते, तसेच आवडीचा कलर निवडता येतो. मात्र प्रत्यक्षात ती पाहता येत नाही.

वस्तू खराब असू शकते - काही अपवाद वगळता ग्राहकांनी ऑनलाइन शॉपिंग केल्यानंतर मिळालेल्या वस्तू खराब असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र असे काही घडल्यास ती वस्तू परत करण्याचीही सोय काही साइट्सनी उपलब्ध करून दिली आहे.

पैशांची अफरातफर - ऑनलाइन वस्तूंची किंमत अदा करताना योग्य त्या पद्धतीने केली पाहिजे. म्हणजेच क्रेडिट किंवा डेबिट कार्डने खरेदी करताना काळजीपूर्वक माहिती दिली पाहिजे आणि पैसे भरले पाहिजेत, नाहीतर अफरातफर होण्याची शक्यता असते.

वस्तूंविषयी संभ्रम - एखादी वस्तू ऑनलाइन शॉपिंग केल्यानंतर ती घरपोच येण्यासाठी किमान २ ते ३ दिवस जातात किंवा त्यापेक्षा जास्तही दिवस जातील. ते तुमच्या ठिकाणावर अवलंबून असते. वस्तू हातात येईपर्यंत त्या वस्तूविषयी मनात एक संभ्रम निर्माण होत असतो.

Web Title: Online sale; Advantages and Disadvantages of Online Shopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.