Lokmat Money > बिझनेस न्यूज > अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टला टक्कर देतंय हे सरकारी ऑनलाईन शॉप! खरेदी करण्यासोबत पैसे कमवण्याची संधी

अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टला टक्कर देतंय हे सरकारी ऑनलाईन शॉप! खरेदी करण्यासोबत पैसे कमवण्याची संधी

ONDC E Commerce : किरकोळ विक्रेत्यांना फ्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारने हा उपक्रम सुरू केला आहे. यावर तुम्ही अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टप्रमाणे वस्तू किंवा सामान मागवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 16:43 IST2025-01-03T16:42:51+5:302025-01-03T16:43:26+5:30

ONDC E Commerce : किरकोळ विक्रेत्यांना फ्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारने हा उपक्रम सुरू केला आहे. यावर तुम्ही अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टप्रमाणे वस्तू किंवा सामान मागवू शकता.

ondc more than seven lakh vendors service providers have join this online platform says government | अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टला टक्कर देतंय हे सरकारी ऑनलाईन शॉप! खरेदी करण्यासोबत पैसे कमवण्याची संधी

अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टला टक्कर देतंय हे सरकारी ऑनलाईन शॉप! खरेदी करण्यासोबत पैसे कमवण्याची संधी

ONDC E Commerce : ऑनलाइन शॉपिंग किंवा फूड ऑर्डर करायचं झालं तर लगेच तुमच्या डोळ्यासमोर फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन, झोमॅटो आणि स्विगी सारखे प्लॅटफॉर्म येतात. याच गोष्टी डिलिव्हर करणारे स्वस्त सरकारी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म माहिती आहे क? जिथे तुम्ही किराणा सामान, गॅजेट्स आणि खाद्यपदार्थ ऑर्डर करू शकता. आम्ही सरकार समर्थित ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ONDC बद्दल बोलत आहोत, ज्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारने सांगितले की, आतापर्यंत ७ लाखांहून अधिक विक्रेते आणि सेवा प्रदाते त्याच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ONDC शी जोडले गेले आहेत.

सरकारच्या पाठिंब्याने ‘ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स’ (ONDC) हा उपक्रम सन २०२१ मध्ये सुरू करण्यात आला. प्रामुख्याने लहान विक्रेत्यांना डिजिटल कॉमर्समध्ये संधी उपलब्ध करुन देण्याचा याचा उद्धेश आहे.

ONDC लहान व्यावसायिकांसाठी उपयुक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ओएनडीसीने लहान व्यवसायांचे सक्षमीकरण आणि ई-कॉमर्समध्ये क्रांती घडवून आणण्यात योगदान दिले आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या पोस्टवर केलेल्या टिप्पणीमध्ये, पंतप्रधान म्हणाले की, गेल्या ३ वर्षांत या व्यासपीठाने लहान उद्योगांना त्यांच्यासाठी मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला आहे. लहान किरकोळ विक्रेत्यांना ई-कॉमर्सशी जोडून त्यांचा व्यवसाय वाढवण्यास आणि या क्षेत्रातील दिग्गजांचे वर्चस्व कमी करण्यास यामुळे मदत होईल. ONDC या गैर-सरकारी कंपनीने २०० हून अधिक नेटवर्क सहभागींसह आतापर्यंत १५ कोटी व्यवहार पूर्ण केले आहेत.

ONDC कसे काम करते?
फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन, झोमॅटो आणि स्विगी सारख्या कंपन्या लहान किरकोळ विक्रेत्यांना सामावून घेत नाहीत. दिवसेंदिवस या कंपन्यांचा देशभर प्रसार होत आहे. याचा थेट परिणाम किरकोळ विक्रेत्यांच्या व्यवसायावर होत आहे. यामुळे सरकारने ओएनडीसी सारख्ये माध्यम उपलब्ध करुन दिले आहे. या प्लॅटफॉर्मवरुन कोणीही नोंदणी करुन आपल्या वस्तूंची ऑनलाईन विक्री करू शकते. इतर ई कॉमर्स कंपन्यांच्या तुलनेत इथे कम खर्चात तुम्ही तुमचे उत्पादन विकू शकता.

Web Title: ondc more than seven lakh vendors service providers have join this online platform says government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.