Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली

Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली

Ola Electric Share Price Today: ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या शेअर्समधील घसरण थांबण्याचं नाव घेत नाहीये. गुरुवारी ट्रेडिंग सत्रादरम्यान या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 12:01 IST2025-12-18T11:54:02+5:302025-12-18T12:01:50+5:30

Ola Electric Share Price Today: ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या शेअर्समधील घसरण थांबण्याचं नाव घेत नाहीये. गुरुवारी ट्रेडिंग सत्रादरम्यान या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली.

Ola Electric shares fall sharply Bhavish Agarwal sells stake to pay off debt but investors concerns increase | Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली

Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली

Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीच्या (Ola Electric Mobility) शेअर्समधील घसरण थांबण्याचं नाव घेत नाहीये. गुरुवारी ट्रेडिंग सत्रादरम्यान 'एनसीई'वर (NSE) हा शेअर सुमारे ४.२९ टक्क्यांनी घसरून ₹३१.४९ प्रति शेअर या पातळीवर पोहोचला. प्रवर्तक भाविश अग्रवाल यांनी बुधवारी अतिरिक्त हिस्सा विकून १४२ कोटी रुपये उभारल्यानंतर बाजारात शेअरवर परिणाम दिसून आला.

शेअरच्या कामगिरीवर एक नजर

ओलाच्या शेअर्समध्ये गेल्या पाच सत्रात सुमारे १२ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर गेल्या एका महिन्यात हा स्टॉक २४ टक्क्यांहून अधिक खाली आलाय. शेअरच्या किमतीचा कल पाहिला तर, हा शेअर आपल्या ₹७६ च्या आयपीओ (IPO) प्राईस बँडच्या तुलनेत ५९ टक्क्यांनी खाली घसरला आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय.

आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास

प्रवर्तकांनी विकला हिस्सा

ओलाचे संस्थापक आणि प्रवर्तक भाविश अग्रवाल यांनी बुधवारी, १७ डिसेंबर रोजी ४.२ कोटी शेअर्सची विक्री केली. याच्या एक दिवस आधी त्यांनी २.६ कोटी शेअर्सची विक्री केली होती. या दोन व्यवहारांचे एकूण मूल्य २३४ कोटी रुपये इतके आहे. कंपनीनं यापूर्वीच स्पष्ट केले होते की, ही विक्री प्रवर्तक स्तरावर असलेले २६० कोटी रुपयांचं कर्ज पूर्णपणे फेडण्याच्या उद्देशानं केली जात आहे.

कर्ज फेडण्यासाठी उचललं पाऊल

भाविश अग्रवाल यांनी आपल्या वैयक्तिक इक्विटी हिस्स्याचं रोखीत रुपांतर करुन, प्रवर्तक स्तरावर गहाण ठेवलेल्या सर्व शेअर्ससाठी जबाबदार असलेले २६० कोटींचे कर्ज पूर्णपणे फेडण्याचा मार्ग मोकळा केला आहे. ही थकबाकी चुकवण्यासाठी प्रवर्तकांच्या हिस्स्यातील छोटा भाग विकण्यासोबतच इतर वैयक्तिक उत्पन्नाच्या स्रोतांचाही वापर करण्यात आला. याचा परिणाम म्हणून, यापूर्वी गहाण ठेवलेल्या शेअर्सपैकी ३.९३% हिस्सा आता पूर्णपणे मुक्त झाला असून संस्थापक-प्रवर्तक आता पूर्णपणे कर्जमुक्त झाले आहेत.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : ओला इलेक्ट्रिक के शेयरों में गिरावट; भाविश अग्रवाल ने कर्ज चुकाने के लिए हिस्सेदारी बेची

Web Summary : ओला इलेक्ट्रिक के शेयर गिर रहे हैं, हाल ही में 4.29% की गिरावट आई। संस्थापक भाविश अग्रवाल ने कर्ज चुकाने के लिए ₹234 करोड़ के शेयर बेचे। आईपीओ मूल्य से स्टॉक 59% नीचे है, जिससे निवेशकों की चिंता बढ़ रही है।

Web Title : Ola Electric Shares Plunge; Bhavish Aggarwal Sells Stake to Repay Debt

Web Summary : Ola Electric's shares are declining, falling 4.29% recently. Founder Bhavish Aggarwal sold shares worth ₹234 crore to clear debt. The stock is down 59% from its IPO price, causing investor concern as shares decline.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.