Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > भाविश अग्रवाल यांच्या अटकेला स्थगिती; शेअर्सनं पकडला सुस्साट स्पीड, प्रकरण काय?

भाविश अग्रवाल यांच्या अटकेला स्थगिती; शेअर्सनं पकडला सुस्साट स्पीड, प्रकरण काय?

Ola CEO Bhavish Aggarwal: भाविश अग्रवाल यांच्या अटकेला स्थगिती मिळाल्याची माहिती समोर आली आहे. जाणून घ्या काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 12:15 IST2026-02-18T12:15:17+5:302026-02-18T12:15:50+5:30

Ola CEO Bhavish Aggarwal: भाविश अग्रवाल यांच्या अटकेला स्थगिती मिळाल्याची माहिती समोर आली आहे. जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Ola CEO Bhavish Aggarwal stay on arrest warrant Shares picked up a good pace whats the matter | भाविश अग्रवाल यांच्या अटकेला स्थगिती; शेअर्सनं पकडला सुस्साट स्पीड, प्रकरण काय?

भाविश अग्रवाल यांच्या अटकेला स्थगिती; शेअर्सनं पकडला सुस्साट स्पीड, प्रकरण काय?

Ola CEO Bhavish Aggarwal: आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी, बुधवारी ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे शेअर्स खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड उडाली. कंपनीशी संबंधित एका सकारात्मक बातमीमुळे शेअरमध्ये अचानक ही तेजी आली. ओलाचे मालक भाविश अग्रवाल यांच्या अटकेला स्थगिती मिळाली आहे, हेच गुंतवणूकदारांनी या शेअरवर उड्या घेण्यामागचं मुख्य कारण ठरलं. बुधवारी ट्रेडिंग दरम्यान ओलाच्या शेअरमध्ये ३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आणि भाव २९.३५ रुपयांपर्यंत पोहोचला. 

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

विशेष म्हणजे, १७ फेब्रुवारी रोजीच या शेअरने २७.३६ रुपयांचा आपला निच्चांकी स्तर (All-time low) गाठला होता, ज्यानंतर आता हा शेअर रिकव्हरी मोडमध्ये आला आहे. मात्र, ७६ रुपयांच्या आयपीओ इश्यू प्राईसच्या तुलनेत हा शेअर अद्याप ६० टक्क्यांहून अधिक घसरलेला आहे आणि ऑगस्ट २०२४ मधील १५७.४० रुपयांच्या उच्चांकी स्तरावरून तब्बल ८० टक्के डिस्काउंटवर मिळत आहे.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची सॅलरी किती आहे? पाहा टोटल नेटवर्थ, इनव्हेस्टमेंट बँकर म्हणूनही केलंय काम

नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबई उच्च न्यायालयानं दक्षिण गोव्याच्या जिल्हा ग्राहक आयोगाद्वारे कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांच्या विरोधात जारी केलेल्या अटक वॉरंटला स्थगिती दिली आहे. कंपनीनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलंय की, वॉरंट जारी करताना जिल्हा ग्राहक आयोगानं ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत आपल्या अधिकारक्षेत्राचं उल्लंघन केल्याचं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. भाविश अग्रवाल यांना नोटीस देऊनही ते आयोगासमोर हजर न झाल्यामुळे हे वॉरंट जारी करण्यात आलं होतं. हे प्रकरण प्रीतेश चंद्रकांत घडी यांनी ओला एस१ प्रो सेकंड जनरेशन स्कूटरमध्ये आलेल्या तांत्रिक समस्यांबाबत दाखल केलेल्या तक्रारीशी संबंधित आहे. समस्या कायम राहिल्यामुळे तक्रारदाराने १.४७ लाख रुपयांचा परतावा आणि मानसिक त्रासापोटी ५०,००० रुपयांची मागणी केली आहे.

तिमाही निकाल आणि विक्रीतील मोठी घट

ओला इलेक्ट्रिकनं १३ फेब्रुवारी रोजी आर्थिक वर्ष २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत. या तिमाहीत कंपनीचा परिचालन महसूल ४७० कोटी रुपये राहिला, जो मागील वर्षाच्या याच कालावधीतील १,०४५ कोटी रुपयांच्या तुलनेत ५५ टक्क्यांची वार्षिक घसरण दर्शवतो. मात्र, डिसेंबर तिमाहीत कंपनीचा तोटा मागील वर्षीच्या ५६४ कोटी रुपयांवरून कमी होऊन ४८७ कोटी रुपये झाला. व्यवसायावर परिणाम झाल्याचं चित्र असून, आर्थिक वर्ष २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीत डिलिव्हरी ६१ टक्क्यांनी घटून ३२,६८० युनिट्सवर आली आहे, जी गेल्या वर्षी याच काळात ८४,०२९ युनिट्स होती.

शेअरचा भाव २० रुपयांपर्यंत घसरणार का?

नुकतेच कोटक सिक्युरिटीज या ब्रोकरेज फर्मनं ओला इलेक्ट्रिकच्या शेअरवर 'विक्री'चा सल्ला दिला असून, यासाठी २० रुपये प्रति शेअरचं टार्गेट निश्चित केले आहे. या देशांतर्गत ब्रोकरेज फर्मच्या मते, ओला इलेक्ट्रिकचे निकाल अपेक्षेपेक्षा कमी राहिलेत आणि विक्रीमध्ये कोणतीही विशेष वाढ झालेली नाही. कंपनी आधीच दबावाखाली असून, भविष्यात तिला मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. यामुळे सध्या शेअरमध्ये जरी काहीशी तेजी दिसत असली, तरी ब्रोकरेज फर्मनं दिलेल्या या टार्गेटमुळे गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.

Web Title : भविश अग्रवाल की गिरफ्तारी पर रोक, ओला शेयर में उछाल।

Web Summary : भविश अग्रवाल की गिरफ्तारी पर रोक के बाद ओला इलेक्ट्रिक के शेयरों में तेजी आई। वारंट ओला एस1 प्रो स्कूटर के मुद्दों के बारे में एक उपभोक्ता शिकायत से संबंधित था। इसके बावजूद, शेयर की कीमत अभी भी अपने आईपीओ मूल्य से काफी नीचे है, विश्लेषकों ने कमजोर नतीजों के कारण और गिरावट की भविष्यवाणी की है।

Web Title : Stay on Bhavish Aggarwal's arrest boosts Ola share price.

Web Summary : Ola Electric shares surged after a stay on CEO Bhavish Aggarwal's arrest. The warrant related to a consumer complaint about Ola S1 Pro scooter issues. Despite this, the share price remains significantly below its IPO price, with analysts predicting further declines due to weak results.