lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > तेल कंपन्या तुपाशी, स्वस्त पेट्राेलसाठी जनता ‘उपाशी’!

तेल कंपन्या तुपाशी, स्वस्त पेट्राेलसाठी जनता ‘उपाशी’!

तरीही पेट्राेल-डिझेलचे दर कमी करण्याची तयारी तेल कंपन्यांची नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 06:11 AM2024-02-09T06:11:05+5:302024-02-09T06:11:39+5:30

तरीही पेट्राेल-डिझेलचे दर कमी करण्याची तयारी तेल कंपन्यांची नाही.

Oil companies starve, people 'starve' for cheap petrol! | तेल कंपन्या तुपाशी, स्वस्त पेट्राेलसाठी जनता ‘उपाशी’!

तेल कंपन्या तुपाशी, स्वस्त पेट्राेलसाठी जनता ‘उपाशी’!

मनाेज रमेश जाेशी 

चालू आर्थिक वर्षात तीन सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑईल, भारत पेट्राेलियम आणि हिंदुस्तान पेट्राेलियम यांनी तब्बल ६९ हजार काेटी रुपयांचा निव्वळ नफा कमाविला. युक्रेन युद्धाच्या काळात तेल कंपन्यांचे झालेले नुकसान कधीचेच भरून निघाले आहे. त्या काळात झालेल्या नुकसानीपाेटी सरकारने तेल कंपन्यांना  एकूण ५२ हजार काेटी रुपयांचे अनुदानही दिले हाेते. नंतर कच्चे तेल स्वस्त झाल्यामुळे कंपन्यांनी माेठ्या प्रमाणावर नफा कमाविला आहे. तरीही पेट्राेल-डिझेलचे दर कमी करण्याची तयारी तेल कंपन्यांची नाही.

कच्च्या तेलाचे दर स्थिर

युक्रेन युद्धामुळे एप्रिल २०२२मध्ये कच्च्या तेलाचे दर १४० डाॅलर्स प्रति बॅरलपर्यंत गेले हाेते. ते आता सरासरी ८० डाॅलर्स प्रति बॅरलवर आले आहेत.

कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या हाेत्या. त्यामुळे तेल कंपन्यांना सध्या डिझेल विक्रीतून ३ रुपये प्रतिलिटर ताेटा हाेत आहे. पेट्राेलवरील नफा घटला आहे. तेल कंपन्यांनी नफा कमाविला. परंतु, हिच स्थिती कायम राहिल्यास पेट्राेल-डिझेल स्वस्त हेऊ शकते. 
    - हरदीपसिंग पुरी, पेट्राेलियम मंत्री.

ओपेककडून उत्पादन कपात

nएप्रिल २०२३मध्ये ओपेक देशांनी १.१६ दशलक्ष बॅरल प्रतिदिन एवढी कच्चे तेल उत्पादन कपात जाहीर केली हाेती.
nमे आणि जून २०२३मध्ये पुन्हा उत्पादन कपात करण्यात आली.
n२०२४ मध्ये आणखी १.४ दशलक्ष बॅरल प्रतिदिन एवढी कपात पुन्हा जाहीर केलेली आहे.
n३६ हजार बॅरल्स तेल युक्रेन युद्धापूर्वी भारत रशियाकडून खरेदी करत हाेता. 
n२२ लाख बॅरल्सपर्यंत रशियाकडील तेलखरेदी गेल्या वर्षी पाेहाेचली हाेती.

देशात पेट्राेल पंप किती?

८६,८५५
पेट्राेल पंप देशात आहेत.

७८,५०१
पेट्राेल पंप इंडियन ऑईल, हिंदुस्तान पेट्राेलियम आणि भारत पेट्राेलियमचे आहेत.

६,३८६
पेट्राेल पंप नायरा एनर्जीचे.

Web Title: Oil companies starve, people 'starve' for cheap petrol!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.