House Rent Increase: घराचे भाडे भरता भरताच पगार संपतो की काय, ही तक्रार आता खरी ठरत आहे. कारण, २०२५ च्या पहिल्या तिमाहीत भारतातील प्रमुख शहरांमधील घरांच्या भाडे दरांत मोठी वाढ झाली आहे. नेमकी किती भाडेवाढ झाली, कोणत्या शहरांत किती भाडेवाढ झाली, हे पाहूया.
कोणत्या घरांना सर्वाधिक मागणी? भाडेकरू दरमहा कमीत कमी भाडे असलेल्या घरांना पसंती देत आहेत. १ बीएचके आणि २ बीएचके घरांना सर्वाधिक मागणी. नोकरदार, आयटी कर्मचारी, विद्यार्थ्यांकडून वाढती मागणी. गृहकर्जाच्या वाढत्या दरांमुळे भाड्याच्या घरांना प्राधान्य. ३० टक्क्यांपर्यंत एकूण भाडेवाढ.
कोणत्या शहरांत किती भाडेवाढ?
बंगळुरू ३०% ६,००० ते १०,००० रु.
हैदराबाद २७% ५,००० ते ९,००० रु.
पुणे २४% ४,५०० ते ८,००० रु.
मुंबई १७% ७,००० ते १२,००० रु.
नोएडा १६% ४,००० ते ७,००० रु.
गुरुग्राम १५% ५,००० ते ९,००० रु.