Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता तुम्हीच अपडेट करा पीएफची माहिती, काेणाला घेता येईल सुविधेचा लाभ?

आता तुम्हीच अपडेट करा पीएफची माहिती, काेणाला घेता येईल सुविधेचा लाभ?

शनिवारी ही सुविधा कार्यरतही झाली आहे. ईपीएफओच्या ७.६ कोटी सदस्यांना या सुविधेचा लाभ घेता येईल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 08:34 IST2025-01-19T08:34:17+5:302025-01-19T08:34:30+5:30

शनिवारी ही सुविधा कार्यरतही झाली आहे. ईपीएफओच्या ७.६ कोटी सदस्यांना या सुविधेचा लाभ घेता येईल.

Now you can update your PF information, who can take advantage of the facility? | आता तुम्हीच अपडेट करा पीएफची माहिती, काेणाला घेता येईल सुविधेचा लाभ?

आता तुम्हीच अपडेट करा पीएफची माहिती, काेणाला घेता येईल सुविधेचा लाभ?

नवी दिल्ली : भविष्य निधी संघटनेचे (ईपीएफओ) सदस्य आपले नाव व जन्मतारीख यांसारख्या वैयक्तिक माहितीत आता स्वत:च ऑनलाइन बदल करू शकतील. त्यासाठी त्यांना रोजगारदाता कंपनीकडून पडताळणीची; अथवा ईपीएफओच्या मंजुरीची गरज राहणार नाही. शनिवारी ही सुविधा कार्यरतही झाली आहे. ईपीएफओच्या ७.६ कोटी सदस्यांना या सुविधेचा लाभ घेता येईल.

याशिवाय ई-केवायसी (आधारशी जोडलेले) असलेले खातेधारक रोजगारदात्यांच्या हस्तक्षेपाशिवाय विनाआधार ओटीपीसह ईपीएफ हस्तांतरण दावे ऑनलाइन दाखल करू शकतील. केंद्रीय श्रम व रोजगारमंत्री मनसुख मांडविया यांनी शनिवारी दोन्ही सुविधांचा शुभारंभ केला.

मांडविया यांनी सांगितले की, ईपीएफओ सदस्यांनी दाखल केलेल्या तक्रारींपैकी २७ टक्के तक्रारी या प्रोफाइल/केवायसीशी संबंधित आहेत. ही सुविधा सुरू झाल्यानंतर या तक्रारी कमी होतील. व्यक्तिगत माहितीतील सुधारणेसाठी आणण्यात आलेल्या नव्या सुविधेचा लाभ मोठा कर्मचारी वर्ग असलेल्या बड्या कंपन्यांनाही होईल.

काेणाला घेता येईल सुविधेचा लाभ?
१ ऑक्टोबर २०१७ नंतर ज्यांचा यूएएन (सार्वभौम खाते क्रमांक) जारी झाला आहे, त्यांना या सुविधेचा लाभ घेता येईल. १ ऑक्टोबर २०१७ पासून यूएएन क्रमांक आधारशी जोडणे बंधनकारक करण्यात आले होते. 
१ ऑक्टोबर २०१७ च्या आधीचा यूएएन असल्यास रोजगारदाता कंपनी ईपीएफओच्या मंजुरीशिवाय तपशिलात बदल करू शकते. अशा प्रकरणांत सहायक दस्तावेजांच्या आवश्यकतेची अट सुलभ करण्यात आली आहे. 
आधारशी जोडणी नसलेल्या यूएएन प्रकरणात मात्र सुधारणा करण्यासाठी कर्मचाऱ्यास रोजगारदात्या कंपनीसमक्ष हजर व्हावे लागेल. 

Web Title: Now you can update your PF information, who can take advantage of the facility?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.