lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > नोटाछपाई हा शेवटचा पर्याय हवा - डी. सुब्बाराव

नोटाछपाई हा शेवटचा पर्याय हवा - डी. सुब्बाराव

D. Subbarao : सुब्बाराव यांना आर्थिक क्षेत्रातील दीर्घ अनुभव असून, त्यांनी केंद्रीय सचिव म्हणूनही यशस्वी काम केलेले आहे.  कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेपासून देशाला सावरताना काळजीपूर्वक पावले उचलायला हवीत, असे त्यांनी सांगितले.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 06:25 AM2021-06-11T06:25:21+5:302021-06-11T06:26:19+5:30

D. Subbarao : सुब्बाराव यांना आर्थिक क्षेत्रातील दीर्घ अनुभव असून, त्यांनी केंद्रीय सचिव म्हणूनही यशस्वी काम केलेले आहे.  कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेपासून देशाला सावरताना काळजीपूर्वक पावले उचलायला हवीत, असे त्यांनी सांगितले.

Note printing should be the last resort: D. Subbarao | नोटाछपाई हा शेवटचा पर्याय हवा - डी. सुब्बाराव

नोटाछपाई हा शेवटचा पर्याय हवा - डी. सुब्बाराव

नवी दिल्ली : कोविड-१९ साथीमुळे घसरणीला लागलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँक थेट अतिरिक्त नोटा छपाई करू शकते; मात्र तो शेवटचा पर्याय असायला हवा, असे प्रतिपादन रिझव्‍‌र्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी केले आहे. आवश्यक निधीची गरज भागविसाठी सरकारने कोविड रोखे बाजारात आणावेत, असा सल्लाही त्यांनी दिला. 
सुब्बाराव यांना आर्थिक क्षेत्रातील दीर्घ अनुभव असून, त्यांनी केंद्रीय सचिव म्हणूनही यशस्वी काम केलेले आहे.  कोविड-१९ साथीच्या दुसऱ्या लाटेपासून देशाला सावरताना काळजीपूर्वक पावले उचलायला हवीत, असे त्यांनी सांगितले. 

- एका मुलाखतीत सुब्बाराव यांनी सांगितले की, वित्तीय तूट रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांना हातभार लावण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँक तत्काळ नोटा छपाई करू शकते. मात्र अतिरिक्त नोटा छपाईमुळे खर्च वाढून वित्तीय तुटीवर अधिक ताण पडू शकतो, हेही लक्षात घेतले पाहिजे. नोटा छपाई हा एक उपाय असला तरी सगळे उपाय संपतील तेव्हाच तो वापरायला हवा.  
- सुब्बाराव म्हणाले की, वित्तीय तूट भरून काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेने नोटांची छपाई करावी, असा पर्याय अनेकदा जाणकारांकडून सुचवला जातो. मात्र रिझर्व्ह बँक या गोष्टी अप्रत्यक्षपणे अर्थव्यवस्थेसाठी उपाययोजना म्हणून करीत असते, हे या जाणकारांना माहीत नसते. 

Web Title: Note printing should be the last resort: D. Subbarao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.