Lokmat Money > बिझनेस न्यूज > नोएल टाटा यांच्या मुलींची रतन टाटा इन्स्टिट्यूटच्या बोर्डावर एन्ट्री! पडद्यामागे काय घडलं?

नोएल टाटा यांच्या मुलींची रतन टाटा इन्स्टिट्यूटच्या बोर्डावर एन्ट्री! पडद्यामागे काय घडलं?

Noel Tata Daughters : रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांची गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. आता त्यांच्या दोन मुलींचा सर रतन टाटा इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूट (SRTII) च्या विश्वस्त मंडळात समावेश करण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 11:15 IST2025-01-09T11:15:07+5:302025-01-09T11:15:50+5:30

Noel Tata Daughters : रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांची गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. आता त्यांच्या दोन मुलींचा सर रतन टाटा इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूट (SRTII) च्या विश्वस्त मंडळात समावेश करण्यात आला आहे.

noel tata daughters maya and leah appointed to sir ratan tata industrial institute board | नोएल टाटा यांच्या मुलींची रतन टाटा इन्स्टिट्यूटच्या बोर्डावर एन्ट्री! पडद्यामागे काय घडलं?

नोएल टाटा यांच्या मुलींची रतन टाटा इन्स्टिट्यूटच्या बोर्डावर एन्ट्री! पडद्यामागे काय घडलं?

Noel Tata Daughters : दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांची अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. नोएल टाटा अध्यपदावर विराजमान झाल्यानंतर टाटा समुहारात अनेक मोठे बदल झाले आहेत. यात रतन टाटा यांनी सुरू केलेल्या एकदोन परंपराही खंडीत झाल्या आहेत. यात आता आणखी एकाची भर पडली आहे. टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांच्या मुली माया आणि लीह यांचा सर रतन टाटा इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूट (SRTII) च्या विश्वस्त मंडळामध्ये समावेश करण्यात आला आहे. हा सर रतन टाटा ट्रस्टची उपकंपनी आहे. जी समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्सच्या २ प्रमुख भागधारकांपैकी एक आहे.

माया आणि लीह टाटा यांनी अरनाज कोतवाल आणि फ्रेडी तलाटी यांची जागा घेतली आहे. या दोघांनीही एसआरटीआयआयच्या विश्वस्त मंडळाचा राजीनामा दिला आहे. यासह, नोएल टाटांची मुले आता सर्व लहान आकाराच्या टाटा ट्रस्टच्या मंडळांमध्ये सामील झाली आहेत. सर रतन टाटा ट्रस्ट आणि अलाईड ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि अलाईड ट्रस्ट या २ मुख्य ट्रस्टमध्ये त्यांचा समावेश करणे बाकी आहे.

गेल्या वर्षी नोएल टाटा अध्यक्षपदावर
नोएल टाटा यांना लीह (वय ३९), माया (वय ३६) आणि नेव्हिल (वय ३२) ही तीन मुले आहेत. नोएल टाटा हे दिवंगत रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. ऑक्टोबर २०२४ मध्ये त्यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. विश्वस्त बदलामुळे अंतर्गत मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे. पदावरुन पायउतार होणार अरनाज कोतवाल यांनी सहकारी विश्वस्तांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. नवीन विश्वस्त आणण्यासाठी ज्या पद्धतीने राजीनामा देण्यास सांगण्यात आले ते योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.

अरनाज यांची नाराजी
"मी सध्या दुबईत आहे, खूप विचार विनिमय केल्यानंतर, मी बुर्झीस यांची विनंती मान्य केली. परंतु, या विषयावर थेट बोलण्यासाठी तुमच्यापैकी कोणीही माझ्याशी संपर्क साधला नाही, याचे मला खूप वाईट वाटते", अशी नाराजी अरनाज यांनी पत्रातून व्यक्त केली. पुढे त्यांनी लिहिलंय, की सीईओ सिद्धार्थ शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली एका अनोळखी व्यक्तीने माझ्याशी संपर्क साधला याचे मला आश्चर्य वाटले. या दोघांचाही SRTII शी संबंध नाही. बुर्जिस तारापोरवाला हे टाटा ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी आहेत आणि सिद्धार्थ शर्मा हे सीईओ आहेत.

तारापोरवाला यांना पाठवलेल्या एका वेगळ्या ईमेलमध्ये त्यांनी सांगितले की, नोएल टाटा यांच्या वतीने तारापोरवाला यांनी तिला राजीनामा देण्यास सांगितले होते. त्यामुळे ती राजीनामा देत आहे. याबाबत मेहली मिस्त्री यांचा फोनही आला असल्याचे त्यांनी सांगितले. टाटा ट्रस्टने यावर भाष्य केले नाही. सर रतन टाटा इंडस्ट्रियल इन्स्टिट्यूटच्या कामकाजाशी जवळून संबंधित असलेल्या लीह आणि माया टाटा यांना अलीकडेच सर रतन टाटा ट्रस्ट (SRTT) च्या विश्वस्त मंडळावर नाव देण्यात आले, असे या प्रकरणाशी परिचित असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले. एसआरटीटीच्या ट्रस्ट डीडनुसार SRTI ला तिच्या ६ बोर्ड सदस्यांपैकी ३ सदस्यांना नामनिर्देशित करण्याचा अधिकार आहे.

काय करतो ट्रस्ट?
फ्रेडी तलाटी आणि अरनाज कोतवाल यांच्या जागी त्यांचा समावेश करण्यात आला आहे. फ्रेडी तलाटी सध्या एनसीपीएमध्ये असून त्यांनी राजीनामा सादर केला आहे. अरनाज कोतवाल दुबईतील व्हीएफएस ग्लोबलमध्ये काम करत आहे. एसआरटीआईआयमध्ये सध्या मोठे बदल केले जात आहेत. हे पाहता, एसआरटीआय विश्वस्तांना एसआरटीआयमध्ये काम करण्याचा अनुभव असलेले आणि नियमितपणे मुंबईत राहणारे नामनिर्देशित उमेदवार हवे होते. या संस्थेची स्थापना १९२८ मध्ये लेडी नवाजबाई टाटा आणि स्त्री जरथोस्त्री मंडळ यांनी गरीब महिलांना रोजगार देण्यासाठी केली होती. संस्थेने महिलांसाठी स्वयंपाक, टेलरिंग, भरतकाम आणि मॉन्टेसरी शिक्षक प्रशिक्षण युनिट्ससाठी संस्था स्थापन केल्या आहेत.

Web Title: noel tata daughters maya and leah appointed to sir ratan tata industrial institute board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.