Lokmat Money > बिझनेस न्यूज > GSTबाबत सरकारकडून भेट, दैनंदिन वापरातील वस्तू कुठल्या स्लॅबमध्ये आल्या? पाहा संपूर्ण यादी

GSTबाबत सरकारकडून भेट, दैनंदिन वापरातील वस्तू कुठल्या स्लॅबमध्ये आल्या? पाहा संपूर्ण यादी

Next Gen GST Reforms: केंद्र सरकारने काल रात्री देशवासियांना ऐन गणेशोत्सवामध्ये दिवाळीपूर्व भेट दिली आहे. बुधवारी दिल्लीत झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या ५६ व्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये अनेक जीवनावश्यक वस्तूंवरील कर घटवण्यात आला असून, याची अंमलबजावणी ही २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 09:23 IST2025-09-04T09:22:52+5:302025-09-04T09:23:21+5:30

Next Gen GST Reforms: केंद्र सरकारने काल रात्री देशवासियांना ऐन गणेशोत्सवामध्ये दिवाळीपूर्व भेट दिली आहे. बुधवारी दिल्लीत झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या ५६ व्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये अनेक जीवनावश्यक वस्तूंवरील कर घटवण्यात आला असून, याची अंमलबजावणी ही २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहे.

Next Gen GST Reforms: Government's gift regarding GST, in which slab did daily use items fall? See the complete list | GSTबाबत सरकारकडून भेट, दैनंदिन वापरातील वस्तू कुठल्या स्लॅबमध्ये आल्या? पाहा संपूर्ण यादी

GSTबाबत सरकारकडून भेट, दैनंदिन वापरातील वस्तू कुठल्या स्लॅबमध्ये आल्या? पाहा संपूर्ण यादी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी देशवासियांना संबोधून केलेल्या भाषणामधून देशवासियांना दिलासा देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार केंद्र सरकारने काल रात्री देशवासियांना ऐन गणेशोत्सवामध्ये दिवाळीपूर्व भेट दिली आहे. बुधवारी दिल्लीत झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या ५६ व्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये अनेक जीवनावश्यक वस्तूंवरील कर घटवण्यात आला असून, याची अंमलबजावणी ही २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहे. दैनंदिन वापरातील वस्तू, कृषी उत्पादने, आरोग्य उत्पादने अशा सुमारे १०० हून अधिक गोष्टींवरील कर कमी करण्यात आला आहे. याची संपूर्ण यादी पुढील प्रमाणे आहे.

अन्नपदार्थ 
-वनस्पती तेल -१२ वरून ५ टक्के 
- मेण वनस्पती मेण - १८ वरून ५ टक्के 
-मांस, मासे, अन्नपदार्थ - १२ वरून ५ टक्के 
- डेअरी उत्पादने (लोणी, तूप, पनीर) १२ वरून ५ टक्के 
- सोया दूध - १२ वरून ५ टक्के 
- साखर, उकडलेली मिठाई  - १२ ते १८ टक्क्यांवरून ५ टक्के 
- चॉकलेट आणि कोको पावडर - १८ टक्क्यांवरून ५ टक्के 
- पास्ता, कॉर्न फ्लेक्स, नुडल्स, बिस्किट, माल्ट एक्सट्रेक्ट - १२ ते १८ टक्क्यांवरून ५ टक्के 
- जॅम, जेली, मुरांबा, मेवा, फळांची पेस्ट, सुका मेवा, १२ टक्क्यांवरून ५ टक्के 
- फळांचा रस, नारळ पाणी १२ टक्क्यांवरून ५ टक्के 
 - आधीपासून पॅक असलेले पिझ्झा ब्रेड, खाखरा, चपाती, भाकरी, ५ वरून शून्य टक्के 

ग्राहक आणि घरगुती वापराच्या वस्तू 
- हेअर ऑईल, शाम्पू, टुथपेस्ट, शेविंग उत्पादने, टॅल्कम पावडर १८ टक्क्यांवरून ५ टक्के 
- टॉयलेट साबण १८ टक्क्यांवरून ५ टक्के 
- टुथब्रश, डेंटल, फ्लॉक्स १८ टक्क्यांवरून ५ टक्के 
 - शेविंग क्रिम/लोशन, आफ्टर शेव, १८ टक्क्यांवरून ५ टक्के
- सामान्य टेबल वेअर/किचन वेअर - १२ टक्क्यांवरून ५ टक्के
- दूध पाजण्याच्या बाटल्या आणि निप्पल, प्लॅस्टिकचे मोती १२ टक्क्यांवरून ५ टक्के
-खोडरब्बर ५ टक्क्यांवरून शून्य
-मेणबत्त्या - ५ टक्क्यांवरून शून्य
-छत्री आणि इतर संबंधित वस्तू - १२ टक्क्यांवरून ५ टक्के
-शिवणकामाच्या सुया - १२ टक्क्यांवरून ५ टक्के
-शिलाई मशीन आणि सुटे भाग - १२ टक्क्यांवरून ५ टक्के 
-कापूस/ज्युटपासून बनवलेल्या हँड बॅग - १२ टक्क्यांवरून ५ टक्के 
-मुलांसाठीचे नॅपकिन आणि डायपर - १२ टक्क्यांवरून ५ टक्के
-बांबू, वेतापासून बनलेलं फर्निचर १२ टक्क्यांवरून ५ टक्के
-दुधाचे डबे - १२ टक्क्यांवरून ५ टक्के
-पेन्सिल, शार्पनर, चॉक - १२ टक्क्यांवरून शून्य टक्के
-मानचित्र, ग्लोब, चार्ट - १२ टक्क्यांवरून शून्य टक्के
-प्रॅक्टिस बुक, नोटबुक १२, ५ टक्क्यांवरून शून्य

इलेक्ट्रॉनिक्स
-एअर कंडिशनर - २८ टक्क्यांवरून १८ टक्के 
- भांडी धुण्याचं यंत्र - २८ टक्क्यांवरून १८ टक्के 
-टीव्ही (एलईडी, एलसीडी), मॉनिटर, प्रोजेक्टर - २८ टक्क्यांवरून १८ टक्के 

कृषी आणि कृषी सामुग्री 
- ट्रॅक्टर (१८००सीसी पेक्षा अधिक क्षमतेच्या रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रॅक्टरना वगळून) १२ वरून ५ टक्के
- ट्रॅक्टरचे मागचे टायर/ट्युब - १८ वरून ५ टक्के
- माती/कटाई/थ्रेसिंगसाठीची कृषी सामुग्री १२ टक्क्यांवरून ५ टक्के 
-कम्पोस्टिंग मशीन -१२ टक्क्यांवरून ५ टक्के 
- स्प्रिंकलर/ ड्रिप सिंचन/लॉन/ स्पोर्ट्स रोलर्स - १२ टक्क्यांवरून ५ टक्के 
- जैव-कीटकनाशक, सुक्ष्म पोषण तत्त्वे १२ टक्क्यांवरून ५ टक्के 
- पंप २८ टक्क्यांवरून १८ टक्के 
- ट्रॅक्टरसाठीचा हायड्रॉलिक पंप १८ टक्क्यांवरून ५ टक्के 

आरोग्य क्षेत्रावरील जीएसटी 
-हेल्थ आणि टर्म इन्शुरन्स - १८ टक्क्यांवरून शून्य टक्के
- थर्मामीटर, डायग्नोस्टिक किट - १२ ते १८ टक्क्यांवरून ५ टक्के
- रक्त ग्लुकोज मॉनिटर (ग्लुकोमीटर) १२ वरून ५ टक्के 
- मेडिकल ग्रेड ऑक्सिजन आणि हायड्रोजन पॅरॉक्साईड १२ टक्क्यांवरून ५ टक्के
- चष्मा १२ टक्क्यांवरून ५ टक्के 
- मेडिकल/सर्जिकल रबरी हातमोजे १२ टक्क्यांवरून ५ टक्के
- औषधे आणि खास औषधे १२ टक्क्यांवरून ५ टक्के किंवा शून्य टक्के
- ठराविक दुर्मीळ औषधे ५ ते १२ टक्क्यांवरून शून्य टक्के

कार-बाईकवरील कर 
- टायर २८ टक्क्यांवरून १८ टक्के
- मोटार वाहन (छोट्या कार, तीन चाकी वाहने, रुग्णवाहिका, ३५० सीसीपेक्षा लहान दुचाकी, व्यावसायिक वाहने) २८ टक्क्यांवरून १८ टक्के
- मोटारसायकल ३५० सीसी पेक्षा लहान २८ टक्क्यांवरून ४० टक्के 
- मोठ्या एसयूव्ही, लक्झरी/प्रीमियम कार, सीमेवरील हायब्रिड कार, रेसिंग कार २८ टक्क्यांवरून ४० टक्के
- रोईंग बोट/होड्या २८ टक्क्यांवरून १८ टक्के
- सायकल आणि बिगर मोटार तीनचाकी वाहन १२ टक्क्यांवरून ५ टक्के

तंबाखू आणि पेय पदार्थ 
-सिगार, सिगारेट, तंबाखू उत्पादने - २८ टक्क्यांवरून ४० टक्के
- विडी (पारंपरिक हाताने वळलेली) २८ टक्क्यांवरून १८ टक्के 
- कार्बोनेटेड/वातीत पेय, स्वादयुक्त पेय, कॅफीनयुक्त पेय २८ ते ४० टक्के 
-झाडांपासून मिळणारं दूध, फळांपासून बनलेले पेय -१८ ते १२ टक्क्यांवरून ५ टक्के

कपडे 
- सिंथेटिक धागे, न शिवलेले कपडे, शिलाई धागा, स्टेपल फायबर १२ आणि १८ टक्क्यांवरून ५ टक्के 
- वस्त्रे,रेडिमेड कपडे २५०० रुपयांपर्यंत १२ टक्क्यांवरून ५ टक्के 
- वस्त्रे,रेडिमेड कपडे २५०० रुपयांहून अधिक १२ वरून १८ टक्के 

कागद
- अभ्यासाची पुस्तके, ग्राफ पुस्तके, प्रयोगशाळेतील वह्यांसाठीच्या कागदावर १२ टक्क्यांवरून शून्य टक्के
- ग्राफिक कागद १२ टक्क्यांवरून १८ टक्के 
- कागदी बॅग, बायोडिग्रेबल बॅग - १८ टक्क्यांवरून ५ टक्के

हस्तशिल्प आणि कला
- नक्षीदार कला उत्पादने (लाकूड, दगड, कॉर्क) - १२ टक्क्यांवरून ५ टक्के
- हाताने बनवलेले कागद आणि पेपर बोर्ड - १२ टक्क्यांवरून ५ टक्के
- हस्तशिल्प लॅम्प - १२ टक्क्यांवरून ५ टक्के
- पेंटिंग, मूर्ती, पेस्टल प्राचीन संग्रहणीय वस्तू १२ टक्क्यांवरून ५ टक्के

चामड्याच्या वस्तू 
 -तयार चामडे - १२ टक्क्यांवरून ५ टक्के
- चामड्याचे सामान - हातमोजे १२ टक्क्यांवरून ५ टक्के

इमारत बांधणी साहित्यावरील कर
- टाइल्स, विटा, दगड घडवण्याचे काम  -१२ टक्क्यांवरून ५ टक्के
-पोर्टलँड, स्लॅग, हायड्रोलिक सिमेंट - २८ टक्क्यांवरून १८ टक्के

ऊर्जा आणि नाविन्यपूर्ण ऊर्जा
- सौर कुकर/वॉटर हिटर, बायोगॅस/पवन/अपारंपरिक ऊर्जा/ सौर ऊर्जा १२ टक्क्यांवरून ५ टक्के
-इंधन, सेल मोटार वाहन १२ टक्क्यांवरून ५ टक्के
- इंधन सेल मोटार वाहन १२ टक्क्यांवरून ५ टक्के
- कोळसा, लिग्नाईट, पीट ५ टक्क्यांवरून १८ टक्के

सेवा क्षेत्र 
- जॉब वर्क, छत्री, छपाई, विटा, फार्मास्युटिकल्स, चामडे आयटीसीसह १२ टक्क्यांवरून आयटीसीसह ५ टक्के
- प्रतिदिन ७ हजार ५०० रुपयांपेक्षा कमी भाडे असलेले हॉटेल १२ टक्क्यांवरून ५ टक्के
- सिनेमा (१०० रुपयांपेक्षा कमी तिकीट) १२ टक्क्यांवरून ५ टक्के
- सौंदर्य प्रसाधने १८ टक्क्यांवरून ५ टक्के (आयटीसी नाही)
- कॅसिनो/रेस क्लब प्रवेश, सट्टेबाजी/जुगार २८ टक्क्यांवरून ४० टक्के
- क्रिकेट सामन्यांचं तिकीट  (घरगुती आणि आंतरराष्ट्रीय) १२ टक्क्यांवरून १८ टक्के  

Web Title: Next Gen GST Reforms: Government's gift regarding GST, in which slab did daily use items fall? See the complete list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.