Lokmat Money > बिझनेस न्यूज > नवे वर्ष देणार लाखाे नाेकऱ्या; कंपन्यांनी झटकली मरगळ, हवे मजबूत मनुष्यबळ; तरुणांना अनेक संधी

नवे वर्ष देणार लाखाे नाेकऱ्या; कंपन्यांनी झटकली मरगळ, हवे मजबूत मनुष्यबळ; तरुणांना अनेक संधी

नाेकरभरतीचा फाेकस ‘एआय’, ‘डेटा’ विश्लेषण आदी नव्या तंत्रज्ञानावर राहणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 12:37 IST2024-12-30T12:34:15+5:302024-12-30T12:37:58+5:30

नाेकरभरतीचा फाेकस ‘एआय’, ‘डेटा’ विश्लेषण आदी नव्या तंत्रज्ञानावर राहणार आहे. 

New Year will provide lakhs of jobs; Companies have taken a step back, need strong manpower; Many opportunities for youth | नवे वर्ष देणार लाखाे नाेकऱ्या; कंपन्यांनी झटकली मरगळ, हवे मजबूत मनुष्यबळ; तरुणांना अनेक संधी

नवे वर्ष देणार लाखाे नाेकऱ्या; कंपन्यांनी झटकली मरगळ, हवे मजबूत मनुष्यबळ; तरुणांना अनेक संधी

नवी दिल्ली : आयटी क्षेत्रात गेल्या दाेन वर्षांमध्ये मरगळ आली हाेती. ती झटकून टाकत हे क्षेत्र नव्याने भरारी घेण्याच्या तयारीत आहेत. आयटी कंपन्यांमध्ये नव्या वर्षात माेठ्या प्रमाणावर नाेकरभरती हाेणार असल्याची चिन्हे आहेत. नाेकरभरतीचा फाेकस ‘एआय’, ‘डेटा’ विश्लेषण आदी नव्या तंत्रज्ञानावर राहणार आहे. 

‘सीआयईएल’ या संस्थेने विविध क्षेत्रांतील नाेकरभरतीचा आढावा घेतला. त्यानुसार, २०२४मध्ये झालेलया नाेकरभरतीच्या तुलनेत नव्या वर्षात १० टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची भरती हाेऊ शकते. बहुतांश कंपन्यांनी तशी तयारी केली आहे. काही माेठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांची भारतातील मनुष्यबळ वाढविण्याची याेजना आहे. तर काही कंपन्यांनी तरुणाईला आपल्याकडे ओढण्यासाठी यावेळी कॅम्पस मुलाखतींवर जाेर दिला आहे. त्यामुळे अनेकांच्या हाती पदवी पडण्यापूर्वी नाेकरीचे पत्र राहणार आहे.

१.२ काेटी नाेकऱ्या देणार इलेक्ट्राॅनिक्स क्षेत्र
- एआय आणि सेमिकंडक्टर क्षेत्रातील विकासामुळे देशातील इलेक्ट्राॅनिक्स क्षेत्र येत्या ३ वर्षांमध्ये १.२ काेटी नाेकऱ्या निर्मिती करणार असल्याचा अंदाज आहे. 

- ३० लाख थेट नाेकऱ्यांची 
निर्मिती हाेईल. तसेच ९० लाख अप्रत्यक्ष राेजगारनिर्मितीचा अंदाज. 

यांना मिळेल संधी
२० लाख आयटीआय व्यावसायिक
१० लाख अभियंते

या क्षेत्रात सर्वाधिक नाेकरभरती
सेमिकंडक्टर, स्टार्टअप्स, सायबर सुरक्षा, नविनीकरणीय उर्जा, एआय, ई-काॅमर्स आदी.

वाढीव मनुष्यबळाची गरज का?
- विस्तार याेजना
- नव्या उत्पादनांचे लाँचिंग
- भविष्यातील श्रमशक्ती घडविणे
- डिजिटल तज्ज्ञांची टीम उभारणे

५०० अब्ज डाॅलरपर्यंत हे उत्पादन पुढील ५ वर्षांमध्ये नेण्याचे लक्ष्य आहे.

१०० अब्ज डाॅलर एवढे देशातील इलेक्ट्राॅनिक्स क्षेत्रातील उत्पादन आहे.
 

Web Title: New Year will provide lakhs of jobs; Companies have taken a step back, need strong manpower; Many opportunities for youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.