Lokmat Money > बिझनेस न्यूज > UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार

UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार

UPI Transactions: युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) ॲप्समधून व्यवहार करणाऱ्यांसाठी १ ऑगस्टपासून काही महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. हे नियम गुगल पे, फोन पे, पेटीएमसह सर्व यूपीआय ॲप्सवर लागू होतील.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 13:51 IST2025-07-29T13:51:35+5:302025-07-29T13:51:35+5:30

UPI Transactions: युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) ॲप्समधून व्यवहार करणाऱ्यांसाठी १ ऑगस्टपासून काही महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. हे नियम गुगल पे, फोन पे, पेटीएमसह सर्व यूपीआय ॲप्सवर लागू होतील.

New restrictions on UPI transactions phonepe gpay paytm Digital discipline to be implemented from August 1 how will it affect you | UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार

UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार

UPI Transactions: युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) ॲप्समधून व्यवहार करणाऱ्यांसाठी १ ऑगस्टपासून काही महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. हे नियम गुगल पे, फोन पे, पेटीएमसह सर्व यूपीआय ॲप्सवर लागू होतील. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) हे बदल जाहीर केले असून, त्यामुळे यूपीआय प्रणाली अधिक जलद, सुरक्षित होईल आणि सर्व्हरवरील ताण कमी होईल.

नियम लागू करण्यामागची कारणे कोणती?

यूपीआय सर्व्हरवर सतत वाढणारा ताण आणि वारंवार होणारे पेमेंट फेल्युअर्स कमी करण्यासाठी एनपीसीआयने ही पावले उचलली आहेत. यामुळे युपीआयद्वारे प्रदान केली जाणारी सेवा अधिक स्थिर आणि कार्यक्षम होण्याची अपेक्षा आहे.

बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

इतर महत्त्वाचे बदल

प्रत्येक बँकेने वर्षातून एकदा आपली प्रणाली (सिस्टीम) ऑडिट करणे बंधनकारक असेल. यासंबंधीचा पहिला अहवाल ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत सादर करावा लागेल. वापरकर्त्याला ३० दिवसांत फक्त दहा

वेळा पेमेंट रिव्हर्सल म्हणजे पैसे परत मिळवण्यासाठी (चार्जबॅक) विनंती करता येईल. नव्याने लागू करण्यात आलेल्या बदलांचा सामान्य पेमेंट सेवांवर (जसे पैसे ट्रान्सफर, मर्चंट पेमेंट) परिणाम होणार नाही.

यूपीआय व्यवहारांतील मुख्य बदल कोण-कोणते?

बॅलन्स चेक करण्यावर मर्यादा : एका यूपीआय ॲपमधून दिवसाला जास्तीत जास्त ५० वेळा बॅलन्स तपासता येईल. सकाळी १० ते दुपारी १ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९.३० यादरम्यान बॅलन्स चेक करण्यावर मर्यादा असेल.

प्रत्येक यशस्वी पेमेंटनंतर बॅलन्सची माहिती : प्रत्येक यशस्वी पेमेंटनंतर ग्राहकाला बॅलन्सची माहिती एसएमएस किंवा ॲप नोटिफिकेशनद्वारे मिळेल. त्यामुळे पुन्हा पुन्हा बॅलन्स तपासण्याची गरज भासणार नाही.

लिंक केलेल्या खात्यांची माहिती : मोबाईल क्रमांकाशी जोडलेल्या बँक खात्यांची माहिती दिवसाला फक्त २५ वेळा पाहता येईल. ही माहिती फक्त ग्राहकाने स्वतः बँक निवडून परवानगी दिल्यासच दिसेल.

‘ऑटो पे’चे नवे वेळापत्रक : नेटफ्लिक्स, एसआयपी, ॲमेझॉन प्राइम यांसारख्या ऑटो पेमेंट्सची रक्कम सकाळी १० वाजेपूर्वी, दुपारी १ ते ५ आणि रात्री ९.३० नंतरच वजा केली जाईल.

पेमेंट स्टेटस पाहण्यावर मर्यादा : पेमेंट अडकले किंवा फेल झाले, तर त्याची स्थिती ९० सेकंदांच्या अंतरानेच पाहता येईल. असे दिवसातून तीन वेळा करता येईल व त्यात ४५ ते ६० सेकंदांचे अंतर आवश्यक असेल.

Web Title: New restrictions on UPI transactions phonepe gpay paytm Digital discipline to be implemented from August 1 how will it affect you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.