Indigo Sale: इंडिगो एअरलाइन्सनं नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रवाशांना मोठा दिलासा देत ‘सेल इनटू २०२६’ (Sale Into 2026) नावानं न्यू इयर सेल लाँच केला आहे. ही ऑफर १३ जानेवारीपासून १६ जानेवारीपर्यंत तिकीट बुकिंगसाठी खुली असेल. या सेलअंतर्गत प्रवासी २० जानेवारी ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत प्रवास करू शकतात. विशेष म्हणजे ही ऑफर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रकारच्या निवडक विमान फेऱ्यांवर लागू असेल.
तिकिटाचे दर किती?
इंडिगोच्या या सेलमध्ये देशांतर्गत प्रवासासाठी एकेरी प्रवासाचे तिकीट १,४९९ रुपयांपासून सुरू होत आहे, तर आंतरराष्ट्रीय मार्गांवर भाडे ४,४९९ रुपयांपासून मिळत आहे. प्रीमियम सुविधा असलेलं 'IndiGoStretch' तिकीट काही देशांतर्गत मार्गांवर ९,९९९ रुपयांपासून उपलब्ध आहे. याशिवाय, दोन वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी देशांतर्गत विमानांमध्ये अवघ्या १ रुपयात तिकीट दिलं जात आहे, मात्र ही बुकिंग इंडिगोच्या डायरेक्ट प्लॅटफॉर्मवरून करणं बंधनकारक आहे.
योग्य जीवन विमा कंपनी कशी निवडावी? कोण-कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या
सवलतींचा तपशील
एअरलाइन्सं प्रवाशांसाठी अतिरिक्त सेवांवरही मोठी सूट दिली आहे. '6E ॲड-ऑन'वर ७०% पर्यंत, प्रीपेड एक्स्ट्रा बॅगेजवर ५०% पर्यंत आणि स्टँडर्ड सीट सिलेक्शनवर १५% पर्यंत सूट दिली जात आहे. तसंच, अधिक लेगरूम हवी असलेल्या प्रवाशांसाठी इमर्जन्सी 'XL' सीट्स निवडक देशांतर्गत मार्गांवर ५०० रुपयांपासून उपलब्ध असतील.
ही ऑफर प्रवासाच्या किमान ७ दिवस आधी केलेल्या बुकिंगवरच ग्राह्य धरली जाईल आणि सर्व बुकिंग चॅनेलवर लागू असेल. प्रवासी इंडिगोची वेबसाइट, मोबाईल ॲप, 6ESkai AI असिस्टंट, व्हॉट्सॲप आणि ट्रॅव्हल पार्टनर प्लॅटफॉर्मद्वारे तिकीट बुक करू शकतात. कमी बजेटमध्ये हवाई प्रवासाचं नियोजन करणाऱ्यांसाठी हा सेल एक उत्तम संधी मानली जात आहे.
