Lokmat Money > बिझनेस न्यूज > ७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 

७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची रिलायन्स रिटेल मोठा धमाका करण्याच्या तयारीत असल्याची बातमी नुकतीच समोर आली होती. ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 13:13 IST2025-06-14T13:12:02+5:302025-06-14T13:13:25+5:30

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची रिलायन्स रिटेल मोठा धमाका करण्याच्या तयारीत असल्याची बातमी नुकतीच समोर आली होती. ...

Net worth of 78 thousand crores, no one knows the name.., who is the owner of the 2,50,000 crore company Sheen | ७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 

७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची रिलायन्स रिटेल मोठा धमाका करण्याच्या तयारीत असल्याची बातमी नुकतीच समोर आली होती. रिलायन्स रिटेल आणि ई-कॉमर्स कंपनी शीनला भारतात कपड्यांचं उत्पादन वाढवायचं आहे. त्याचबरोबर भारतात तयार झालेले शीन ब्रँडचे कपडे त्यांना जगभरात विक्रीसाठी उपलब्ध करायचे आहेत. शीन ही ई-कॉमर्स कंपनी आहे. याची सुरुवात चीनमध्ये झाली पण आता त्याचं मुख्यालय सिंगापूरमध्ये आहे. शीन ही मोठी फास्ट फॅशन कंपनी आहे. त्यातून वर्षाला ३० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त कमाई होते. स्वस्त दर आणि मार्केटिंगच्या माध्यमातून शीन ग्राहकांना आकर्षित करते. पण त्याच्या मालकाबद्दल फार कमी लोकांना माहितीये.

शीनचे संस्थापक ख्रिस शू आहेत, ज्यांना स्काय शू म्हणूनदेखील ओळखलं जातं. शू हे शीनचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. शीन हा अतिशय वेगाने वाढणारा फॅशन ब्रँड आहे. हा ब्रँड जेन झीमध्ये खूप लोकप्रिय आहे. शीन १५० हून अधिक देशांमध्ये ट्रेंडी कपड्यांची विक्री करते. शीननं २०१८ मध्ये भारतात हा व्यवसाय सुरू केला. पण २०२० मध्ये भारत सरकारनं शीनसह काही चिनी कंपन्यांवर बंदी घातली. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात शीननं रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत करार करून भारतात प्रवेश केला आणि ShienIndia.in नावाची वेबसाइट सुरू केली. ही वेबसाईट शीन ब्रँडचे भारतात बनवलेले कपडे विकते, तर इतर शीन वेबसाइट्स मुख्यत: चीनमध्ये बनवलेले कपडे विकतात.

एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?

याची सुरुवात कशी झाली

४१ वर्षीय शू यांच्याबद्दल सार्वजनिकरित्या फारशी माहिती उपलब्ध नाही. याचं कारण म्हणजे ते मीडियापासून दूर राहतात. त्यांचा जन्म १९८४ मध्ये चीनमधील शेडोंग प्रांतात झाला. आता त्यांच्याकडे सिंगापूरचं नागरिकत्व आहे, जिथे त्यांच्या कंपनीचे मुख्यालय आहे. चीनच्या चिंगदाओ युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधून त्यांनी बॅचलर ऑफ सायन्सची पदवी घेतली.

ग्रॅज्युएशन नंतर शू यांनी मार्केटिंग क्षेत्रात काम केलं. नानजिंग ओदाओ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनमध्ये (एसईओ) मध्ये त्यांनी स्पेशलायझेशन केलं. यानंतर शू यांच्या लक्षात आले की, जागतिक बाजारपेठेत चिनी उत्पादनांची विक्री करण्यास भरपूर वाव आहे. २००८ मध्ये, शू यांनी दोन व्यावसायिक भागीदारांसह नानजिंग डायनवेई माहिती तंत्रज्ञानाची स्थापना केली. 

नेटवर्थ किती?

त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी SheInside नावाची कंपनी सुरू केली. सुरुवातीला ही कंपनी लग्नाच्या कपड्यांची विक्री करत होती. २०१५ मध्ये कंपनीचं नाव बदलून शीन करण्यात आलं. त्याच वर्षी शू यांनी कंपनीचं मुख्यालय नानजिंग हून ग्वांगझू आणि नंतर २०२२ मध्ये सिंगापूर येथे हलवलं. शू हे शीनचे सीईओ आहेत आणि कंपनीचे सर्वात मोठे वैयक्तिक भागधारक देखील मानले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली शीननं जगातील सर्वात मोठ्या फॅशन रिटेलर्समध्ये नाव कमावलंय.

अल्ट्रा-फास्ट फॅशन मॉडेल्स, विस्तृत उत्पादन श्रेणी आणि कमी किंमतींसाठी कंपनी ओळखली जाते. फोर्ब्सनुसार, शू यांची नेटवर्थ ९.१ अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास ७८,००० कोटी रुपये आहे. ते चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. कंपनीने २०२२ च्या पहिल्या सहा महिन्यांत १०० अब्ज डॉलर्सच्या मूल्यांकनावर पैसे उभे केले होते. पण नंतर जगभरातील शेअर बाजारात घसरण झाल्यानं त्याचं मूल्यांकन घसरलं.

Web Title: Net worth of 78 thousand crores, no one knows the name.., who is the owner of the 2,50,000 crore company Sheen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.