Lokmat Money > बिझनेस न्यूज > ना चादर ना ब्लँकेट, तरीही रेल्वेने प्रवाशांकडून वसूल केले 220 कोटी रुपये

ना चादर ना ब्लँकेट, तरीही रेल्वेने प्रवाशांकडून वसूल केले 220 कोटी रुपये

Railways : रेल्वेमध्ये प्रवास करताना ब्लँकेट, चादरी देण्यात याव्यात, अशी मागणी सर्व प्रवाशांची अनेक दिवसांपासून होत होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 13:47 IST2022-02-11T13:46:27+5:302022-02-11T13:47:13+5:30

Railways : रेल्वेमध्ये प्रवास करताना ब्लँकेट, चादरी देण्यात याव्यात, अशी मागणी सर्व प्रवाशांची अनेक दिवसांपासून होत होती.

neither the sheet nor the blanket yet the railways recovered rs 220 crore from the passengers | ना चादर ना ब्लँकेट, तरीही रेल्वेने प्रवाशांकडून वसूल केले 220 कोटी रुपये

ना चादर ना ब्लँकेट, तरीही रेल्वेने प्रवाशांकडून वसूल केले 220 कोटी रुपये

नवी दिल्ली : देशाच्या बहुतांश भागात कडाक्याची थंडी आहे. अशा स्थितीत भारतीय रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थंडीपासून हतबल व्हावे लागत आहे. रेल्वेच्या आदेशानंतरही गाड्यांमध्ये ब्लँकेट (Blanket, चादरी, उशा यासह अनेक गोष्टी प्रवाशांना देण्यात आल्या नाहीत. दरम्यान, प्रवाशांना संपूर्ण किट उपलब्ध केली जाईल, ज्याची किंमत 300 रुपये असेल, असे रेल्वेने सांगितले होते. यामुळे रेल्वेने 220 कोटी रुपये वसूल केले, मात्र प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

कोरोनानंतर सुविधा बंद
गेल्या वर्षी कोरोनाची महामारी सुरू झाल्यानंतर रेल्वेने गाड्यांमध्ये ब्लँकेट, चादरी, उशा देणे बंद केले होते. प्रवासादरम्यान प्रवाशांना ब्लँकेट घरून न्यावे लागले. अनेक प्रवाशांना घरातून ब्लँकेट वगैरे घेऊन जाणे पसंत नव्हते. विशेषत: ते लोक, जे मीटिंगसाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात पटकन जातात. रेल्वेमध्ये प्रवास करताना ब्लँकेट, चादरी देण्यात याव्यात, अशी मागणी सर्व प्रवाशांची अनेक दिवसांपासून होत होती.

या वस्तूंसाठी रेल्वेने दिले अतिरिक्त शुल्क आकारण्याचे आदेश
यानंतर रेल्वेने ट्रेनमध्ये संपूर्ण किट देण्याची सुविधा सुरू केली. रेल्वेच्या आदेशात असे म्हटले आहे की, प्रवासी गरजेनुसार वस्तू खरेदी करू शकतात, उदाहरणार्थ, जर एखाद्या प्रवाशाला फक्त ब्लँकेट घ्यायचे असेल तर तो ब्लँकेट खरेदी करू शकतो आणि आवश्यक असल्यास संपूर्ण किट देखील 300 रुपयांत खरेदी करू शकतो. ब्लँकेटसाठी 180 रुपये, उशीसाठी 70 रुपये आणि चादरीसाठी 40 रुपये मोजावे लागतात. प्रवास संपल्यानंतर प्रवासी या वस्तू सोबत घेऊन जाऊ शकतात.

रेल्वेने  220 कोटी रुपये केले वसूल
रेल्वेने ब्लँकेट आणि चादर देऊन बराच पैसा वाचवला. या वस्तू धुण्यासाठी लागणारे लाखो रुपयेही वाचले. दैनिक यात्री असोसिएशनचे अध्यक्ष एसएस उप्पल यांनी सांगितले की, लिनेनवर  40 ते 70 रुपयांपर्यंत खर्च येत आहे. रेल्वेने ही सुविधा संपवली, पण तिकीट दरात काही फरक पडला नाही. या सर्व खर्चासह एकूण 220 कोटी रुपये रेल्वेने वसूल केले.

Web Title: neither the sheet nor the blanket yet the railways recovered rs 220 crore from the passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.