बँका कर्ज देताना ‘पत गुण’ (क्रेडिट स्कोर) पाहतात. पण, विद्यार्थ्यांसाठी काही असे शैक्षणिक कर्जे अशी आहेत, जी पत गुण नसतानाही मिळू शकतात. ज्यांचे पत गुण नाहीत किंवा कमी आहेत, त्यांनी घाबरण्याची गरज नाही.
योग्य कागदपत्रे व स्पष्ट माहिती दिल्यास शैक्षणिक कर्ज मिळू शकते. बँका तुमचे कॉलेज, अभ्यासक्रम, भविष्यातील कमाई आणि तुमचा सह-स्वाक्षरीदार (को-सायनर) याकडे जास्त लक्ष देतात. पत गुण नसल्यास चांगला सह-स्वाक्षरीदार असणे खूप महत्त्वाचे असते. पालक किंवा जवळचा नातेवाइक सह-कर्जदार होऊ शकतो.
नेमके काय करावे?
नावाजलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला असेल आणि चांगली नोकरी मिळू शकणारा अभ्यासक्रम असेल, तर कर्जमंजुरीची शक्यता वाढते. तुम्ही हा अभ्यासक्रम व तुमच्या करिअर योजना कशा पूर्ण करणार आहात हे सांगा.
त्यामुळे कर्जदात्यास तुमच्या परतफेड क्षमतेबाबत खात्री वाटेल. अभ्यासक्रम कालावधी आणि भविष्यातील पगाराची नीट माहिती बँकेला द्या.
