Nazara Technologies Share: नझारा टेक्नॉलॉजीजचे शेअर्स सतत फोकसमध्ये आहेत. कंपनीच्या शेअर्समध्ये सध्या मोठी घसरण होत आहे. कामकाजादरम्यान शेअर्सची किंमत सुमारे ११% ने घसरली आणि ती बीएसईवर ₹ १,०८५ वर पोहोचली. बुधवारी, शेअर्सची किंमत सुमारे १८% ने घसरली होती. एकूणच, दोन दिवसांत सुमारे २९% ची मोठी घसरण नोंदवली गेली आहे. दरम्यान, रेखा झुनझुनवालांनी अलीकडेच नझारा टेक्नॉलॉजीजमधील त्यांचा हिस्सा कमी केला आणि गेमिंग बंदी लागू होण्यापूर्वीच कंपनीचे शेअर्स विकले. सरकारनं ऑनलाइन गेमिंगशी संबंधित काही नियम आणि निर्बंध लादल्यामुळे हे पाऊल खूप विचारपूर्वक उचलले गेलं असल्याचं मानलं जात आगे. यामुळे, गेमिंग कंपन्यांच्या शेअर्सवर दबाव वाढलाय.
यांची गुंतवणूक कायम?
मोठे गुंतवणूकदार निखिल कामत (झेरोधाचे सह-संस्थापक) आणि सुप्रसिद्ध गुंतवणूकदार मधुसूदन केला यांनी कंपनीतील त्यांचे शेअर्स कायम ठेवले आहेत. त्यांनी कंपनीच्या शेअर्समध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. याचा अर्थ असा की ते अजूनही कंपनीच्या दीर्घकालीन वाढीवर आणि व्यवसाय मॉडेलवर विश्वास ठेवतात. नझारा टेक्नॉलॉजीजनं म्हटल्यानुसार जर प्रस्तावित ऑनलाइन गेमिंग बिल पुढे गेलं तर पोकरमधील त्यांची ८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक संभाव्यतः राईट ऑफ करावी लागू शकते, परंतु त्यांच्या एकूण कमाईवर परिणाम होणार नाही.
सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
कंपनीचा व्यवसाय
नझारा टेक्नॉलॉजीज मुलांचे गेम्स, ई-स्पोर्ट्स आणि डिजिटल लर्निंग यासारख्या सेगमेंट्समध्ये कार्यरत आहे. गेल्या काही वर्षांत कंपनीचा चांगला विस्तार झाला आहे आणि अनेक परदेशी बाजारपेठांमध्येही तिनं आपलं अस्तित्व निर्माण केलंय. दरम्यान, अलीकडील गेमिंग नियम आणि कर आकारणीमुळे या क्षेत्रावर दबाव येत आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)