Navratri Jewelry Offers : आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. या दिवसांत सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. जर तुम्हीही यावर्षी सोने खरेदीचा विचार करत असाल, तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. सध्या अनेक प्रमुख ज्वेलरी ब्रँड्स सोन्याच्या दागिन्यांवर आकर्षक सूट आणि भरघोस ऑफर्स देत आहेत. किमतीवरील सवलतीसोबतच मेकिंग चार्जवर सूट आणि मोफत सोन्याची नाणी मिळवण्याचीही संधी आहे.
कोणत्या ब्रँडवर काय ऑफर?
तनिष्क
कंपनीच्या वेबसाइटनुसार, तनिष्कने नवरात्री आणि सणासुदीच्या हंगामासाठी खास ऑफर जाहीर केली आहे. या ऑफर अंतर्गत, तुम्ही २२ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सोन्याच्या दागिन्यांची आगाऊ बुकिंग करून सोन्याचा दर 'फिक्स' (निश्चित) करू शकता. बुकिंगच्या दिवशीचा सोन्याचा दर आणि बिलिंगच्या दिवशीचा दर, या दोन्हीपैकी जो दर कमी असेल, त्याच दराने तुम्हाला बिल दिले जाईल. यासाठी तुम्हाला ऑर्डर करताना किमान २५% रक्कम ॲडव्हान्स म्हणून जमा करावी लागेल.
इंद्रिय
आदित्य बिर्ला ग्रुपचा ज्वेलरी ब्रँड 'इंद्रिय' सोने आणि हिऱ्याच्या दागिन्यांवर ३५ टक्क्यांपर्यंत सूट देत आहे. याव्यतिरिक्त, 'डबल गोल्ड रेट प्रोटेक्शन' ऑफरही आहे, ज्यात तुम्ही २० टक्के ॲडव्हान्स रक्कम देऊन सोन्याचा दर लॉक करू शकता.
पीसी ज्वेलर्स
पीसी ज्वेलर्स आपल्या ऑनलाइन खरेदीवर हिऱ्याच्या दागिन्यांवर ३० टक्क्यांपर्यंत सूट देत आहे. तसेच, सिल्व्हर डायमंड ज्वेलरीवर ५०% ची थेट सवलत उपलब्ध आहे.
जोयालुक्कास
तुम्ही जर जोयालुक्कासकडून दागिने खरेदी करत असाल, तर कोणत्याही प्रकारच्या ज्वेलरीच्या मेकिंग चार्जवर तुम्हाला थेट ५० टक्के सूट मिळेल. या ऑफरचा लाभ ५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत घेता येईल.
पंजाब ज्वेलर्स
पंजाब ज्वेलर्स (प्रा. लि.) नवरात्रीच्या उत्सवासाठी खास ऑफर देत आहे. यानुसार, २० ग्रॅम किंवा त्याहून अधिक किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर, किंवा १ लाख किंवा त्याहून अधिक किमतीच्या हिऱ्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर एक सोन्याचे नाणे (Gold Coin) मोफत मिळेल. ही ऑफर २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत उपलब्ध आहे.
सणासुदीच्या काळात अशा अनेक ऑफर्समुळे सोने खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे, खरेदी करण्यापूर्वी प्रत्येक ब्रँडच्या ऑफर्सची तुलना करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते.