नवनूर कौर यांनी नोकरी सोडून गुळाच्या व्यवसायात घववघवीत यश संपादन केलं आहे. IMT गाझियाबादमधून एमबीए केल्यानंतर त्यांनी बँकेत नोकरी केली. पण आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी घरच्यांच्या इच्छेविरुद्ध नोकरी सोडली आणि स्वतःचा स्टार्टअप सुरू केला. 'जॅगरकेन' नावाचा त्यांचा स्टार्टअप आता २२ जिल्ह्यांमध्ये पसरला आहे. यातून वर्षाला २ कोटी रुपये कमावतं आहेत. हे सर्व त्यांनी आपल्या मेहनतीतून आणि जिद्दीने मिळवलं आहे. त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल जाणून घेऊया...
लुधियानामध्ये वाढलेल्या नवनूर कौर यांचे वडील प्राध्यापक आहेत आणि आई शाळेच्या मुख्याध्यापिका आहे. अभ्यासात नेहमीच हुशार असलेल्या नवनूर यांनी २०१९ मध्ये IMT गाझियाबादमधून एमबीए पूर्ण केलं. त्यानंतर गुडगावमधील कोटक बँकेत नोकरी मिळाली. चांगला पगार असूनही फूड बिझनेस सुरू करण्याचा विचार त्यांच्या मनात कायम होता. कुटुंबातील अनेकांना मधुमेह असल्याने त्याला गूळ विकण्याची कल्पना सुचली. साखरेला आरोग्यदायी पर्याय शोधायचा होता. कोणतीही मोठी कंपनी केमिकलमुक्त गुळ बाजारात विकत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
नवनूर कौर यांनी आपल्या बचतीतून 'जॅगरकेन' सुरू केलं. दिवसभर ऑफिसमध्ये काम केल्यानंतर त्या रात्री तिच्या स्टार्टअपवर काम करायच्या. नोकरी सोडावी असं त्यांच्या कुटुंबीयांना वाटत नव्हतं. पण नवनूर यांनी कुटुंबीयांना आपला निर्णय सांगितला. सुरुवातीला त्यांनी घरोघरी मार्केटिंगही केलं. जेव्हा लोकांना त्यांचे गुळाचे पदार्थ आवडू लागले तेव्हा त्यांचा आत्मविश्वास आणखी वाढला.
गुळावर प्रयोग करत असताना नवनूर कौर यांनी अनेक नवीन उत्पादनं तयार केली. कौशल नावाचा एक विद्यार्थी असून तो पंजाबमध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्लांट चालवायचा. दोघेही एकत्र काम करू लागले. कौशल मॅन्युफॅक्चरिंग पाहतो, तर नवनीत ब्रँडिंग, ऑपरेशन्स आणि टाय-अप हाताळतो. नवनूर यांनी नोकरीतून वाचवलेले ५ लाख रुपये व्यवसायात गुंतवले.
मार्ग सोपा नव्हता. कमी मार्जिन आणि कमी शेल्फ लाइफमुळे अनेक दुकानदारांनी त्याच्या उत्पादनांचा साठा करण्यास नकार दिला. पण नवनूर यांना हार मानली नाही. कौशल याने गुळाचे शेल्फ लाइफ १ महिन्यावरून ९ महिन्यांपर्यंत वाढवले. आता त्यांची उत्पादने परदेशातही निर्यात केली जातात. २५ लोकांना रोजगार दिला. यामध्ये महिलांचाही समावेश आहे. आता त्यांचा स्टार्टअप वार्षिक २ कोटी कमवत आहे. ज्यांना नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी नवनूर यांची कथा प्रेरणादायी आहे.