Lokmat Money > बिझनेस न्यूज > ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?

ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?

NASA Satelliets : अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाचा फटका आता जागतिक कीर्तीच्या अवकाश संशोधन संस्था नासालाही बसला आहे. या संस्थेवर आपलेच उपग्रह विकण्याची वेळ आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 13:00 IST2025-07-21T13:00:06+5:302025-07-21T13:00:59+5:30

NASA Satelliets : अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाचा फटका आता जागतिक कीर्तीच्या अवकाश संशोधन संस्था नासालाही बसला आहे. या संस्थेवर आपलेच उपग्रह विकण्याची वेळ आली आहे.

NASA's JPL Selling Satellites Amid Trump Budget Cuts Climate Research at Risk | ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?

ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?

Science News : जगभरात अवकाश संशोधनासाठी प्रसिद्ध असलेल्या नासा या संस्थेवर सध्या आर्थिक संकट आल्याचे दिसत आहे. नासा वॉच या ब्लॉगनुसार, नासाची प्रसिद्ध जेट प्रोपल्शन लॅब सध्या त्यांचे काही उपग्रह चक्क व्यावसायिक विक्री म्हणून विकत आहे. ट्रम्प प्रशासन अंतराळ संस्थेच्या निधीत मोठी कपात करण्याची योजना आखत आहे. या बजेट कपातीमुळे इतर ग्रहांशी संबंधित प्रकल्पांव्यतिरिक्त, पृथ्वीशी संबंधित अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांवरही परिणाम होणार आहे.

कोणते उपग्रह विक्रीसाठी उपलब्ध आहेत?
मिळालेल्या माहितीनुसार, विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या उपग्रहांमध्ये हवामान बदलाच्या परिणामांचा अभ्यास करणारे अनेक पृथ्वी-निरीक्षण उपग्रह आहेत. 'द बाईट'च्या अहवालानुसार, काही असे उपग्रह देखील आहेत, जे अजून प्रक्षेपित झालेले नाहीत, पण तरीही ते विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.

नासा वॉचच्या मते, ही विक्री इतर प्रकल्पांसाठी पैसे जमा करण्याचा एक मार्ग आहे. ट्रम्प प्रशासनाच्या २०२६ च्या अर्थसंकल्पीय प्रस्तावात असे उपग्रह निवृत्त करण्याचे आवाहन करण्यात आले होते, असे 'काउइंग' यांनी लिहिले आहे.

बजेटमध्ये किती कपात केली जाईल?
या बजेट कपातीमुळे वैज्ञानिक समुदायात संतापाची लाट आहे. ट्रम्प प्रशासन नासाच्या विज्ञान संचालनालयाचे बजेट अर्ध्याहून अधिक कपात करण्याचा विचार करत आहे. 'कॉविंग' यांनी लिहिले आहे की, जेपीएल आता आपले उपग्रह सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील खरेदीदारांना विकण्याचा किंवा परत करण्याचा विचार करत आहे, ज्यामुळे काही प्रमाणात निधी उभारण्यास मदत होऊ शकते.

शास्त्रज्ञांकडून तीव्र प्रतिक्रिया
हा 'हास्यास्पद' प्रकार  असल्याची तीव्र प्रतिक्रिया शास्त्रज्ञ देत आहेत. जेपीएलचे वरिष्ठ अभियंता लुईस अमारो यांनी लिंक्डइनवर लिहिलंय, की "आजकाल आपल्याला जेपीएलमध्ये विनोदी मूड राखावा लागतो." बजेट कपातीमुळे प्रभावित झालेल्या मोहिमांपैकी एक असलेल्या नासाच्या 'आर्टेमिस IV' चे मिशन इंटिग्रेशन हेड जोसेफ जॉन्सन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना मतदान करणाऱ्यांवर टीका केली आहे आणि म्हटले की, "सापाचे तेल अजूनही विकले जाते" याचा अर्थ लोक फसव्या गोष्टींवर विश्वास ठेवतात.

वाचा - आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश

उपग्रहांचे महत्त्व आणि ट्रम्प यांची भूमिका
हे उपग्रह पर्यावरण आणि हवामानाशी संबंधित खूप महत्त्वाची माहिती पुरवतात. ते वादळांसारख्या मोठ्या नैसर्गिक बदलांबद्दल आणि घटनांबद्दल वेळेवर इशारा देखील देतात, ज्यामुळे मोठ्या नुकसानीपासून वाचता येते. दुसरीकडे, ट्रम्प वारंवार हवामान बदल नाकारत आहेत. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की ही त्यांची 'अनौपचारिक' वृत्ती आहे, ज्यामुळे नासाच्या अनेक महत्त्वाच्या मोहिमांवर बंद पडण्याची वेळ आली आहे. नासासारख्या संस्थेवर आलेल्या या आर्थिक संकटाचा जागतिक स्तरावर हवामान अभ्यास आणि अवकाश संशोधनावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

Web Title: NASA's JPL Selling Satellites Amid Trump Budget Cuts Climate Research at Risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.