lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Mutual Funds: 167 रुपयांच्या बचतीतून 11.33 कोटींचा लाभ! जाणून घ्या गुंतवणुकीचे गणित...

Mutual Funds: 167 रुपयांच्या बचतीतून 11.33 कोटींचा लाभ! जाणून घ्या गुंतवणुकीचे गणित...

Mutual Fund SIP Investment: छोट्या गुंतवणुकीत मोठा नफा मिळवायचा असेल तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 05:35 PM2022-05-18T17:35:49+5:302022-05-18T17:36:10+5:30

Mutual Fund SIP Investment: छोट्या गुंतवणुकीत मोठा नफा मिळवायचा असेल तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे.

Mutual Funds: Profit of Rs 11.33 crore from savings of Rs 167 per day! Learn the math of investing | Mutual Funds: 167 रुपयांच्या बचतीतून 11.33 कोटींचा लाभ! जाणून घ्या गुंतवणुकीचे गणित...

Mutual Funds: 167 रुपयांच्या बचतीतून 11.33 कोटींचा लाभ! जाणून घ्या गुंतवणुकीचे गणित...

Mutual Fund SIP: भविष्याबाबत आत्तापासूनच प्लॅनिंग केले तर म्हातारपणात अडचणी येत नाहीत. तुम्ही अजून गुंतवणुकीला सुरुवात केली नसेल तर आताच करा. जर तुम्हाला छोट्या गुंतवणुकीत मोठा नफा मिळवायचा असेल तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला गुंतवणुकीच्या काही मूलभूत तत्त्वांबद्दल सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही कमी वेळात छोट्या गुंतवणुकीने मोठा फंड बनवू शकता.

तरुणपणी गुंतवणूक करा
गुंतवणुकीसाठी योग्य वेळ निवडणे खूप महत्त्वाचे आहे. गुंतवणूक सल्लागार नेहमी तरुणपणापासूनच गुंतवणूक सुरू करण्याची शिफारस करतात. यामुळे तुम्हाला दीर्घ गुंतवणुक करता येते आणि यातून मोठा लाभही मिळतो. कमी जोखीम आणि जास्त रिटर्नसाठी तुम्ही SIP द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. यातून तुम्हाला दीर्घ मुदतीत कोट्यवधी रुपये मिळू शकतात.

म्युच्युअल फंडातील एसआयपी करोडपती बनवेल
एका गणितातून समजून घ्या. जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी SIP द्वारे गुंतवणूक करायला सुरुवात केली दिवसाला 167 रुपये(5000 रुपये महिना) वाचवले आणि SIP द्वारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली. तर, निवृत्तीच्या वयाच्या 60 व्या वर्षी तुमच्याकडे 11.33 कोटी इतकी मोठी रक्कम असेल.

मासिक गुंतवणूक रु 5000

  • अंदाजे परतावा 14%
  • वार्षिक SIP 10% वाढ
  • एकूण गुंतवणूक कालावधी 35 वर्षे
  • एकूण गुंतवणूक रु. 1.62 कोटी
  • एकूण परतावा रु. 9.70 कोटी
  • परिपक्वता रक्कम रु. 11.33 कोटी

या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा
-दरवर्षी जेव्हा तुमचा पगार वाढतो तेव्हा गुंतवणुकीची रक्कमही वाढवा.
-तुम्हाला 35 वर्षांच्या दीर्घ कालावधीत कंपाउंडिंगचे मोठे फायदे मिळतात.
-म्युच्युअल फंड तुम्हाला दीर्घ मुदतीसाठी 10-16 टक्के वार्षिक परतावा देतात.
-जेव्हा तुम्ही दरवर्षी तुमची गुंतवणूक वाढवत राहाल, तेव्हा तुम्ही निवृत्तीपूर्वीच करोडपती व्हाल.

(डिस्केमर: म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. कृपया कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञाचा सल्ला घ्या.)

Web Title: Mutual Funds: Profit of Rs 11.33 crore from savings of Rs 167 per day! Learn the math of investing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.