Lokmat Money > बिझनेस न्यूज > म्युच्युअल फंड गुंतवणूक सर्वकालीन उच्चांकावर, डिसेंबरमध्ये ₹ 26459 कोटींची गुंतवणूक

म्युच्युअल फंड गुंतवणूक सर्वकालीन उच्चांकावर, डिसेंबरमध्ये ₹ 26459 कोटींची गुंतवणूक

SIP investment: डिसेंबर 2024 मध्ये म्युच्युअल फंडातील SIP ने प्रथमच रु. 26,000 कोटींचा आकडा ओलांडला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 16:18 IST2025-01-09T16:18:45+5:302025-01-09T16:18:55+5:30

SIP investment: डिसेंबर 2024 मध्ये म्युच्युअल फंडातील SIP ने प्रथमच रु. 26,000 कोटींचा आकडा ओलांडला आहे.

Mutual Fund Investment at All-Time High, ₹ 26459 Crore Investment in December | म्युच्युअल फंड गुंतवणूक सर्वकालीन उच्चांकावर, डिसेंबरमध्ये ₹ 26459 कोटींची गुंतवणूक

म्युच्युअल फंड गुंतवणूक सर्वकालीन उच्चांकावर, डिसेंबरमध्ये ₹ 26459 कोटींची गुंतवणूक

Mutual Fund SIP Hits All-Time High: सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली आहे. डिसेंबर 2024 मध्ये म्युच्युअल फंडातील SIP ने पहिल्यांदाच रु. 26,000 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. हा आकडा रु. 26,459 कोटींवर पोहोचला आहे, जो नोव्हेंबर 2024 मध्ये रु. 25,320 कोटी होता. तसेच, इक्विटी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक डिसेंबर महिन्यात 15 टक्क्यांनी वाढून 41,155 कोटी रुपये झाली आहे.

SIP गुंतवणूक 26000 कोटींच्या पुढे 
डिसेंबर महिन्यात शेअर बाजारात प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाले. परकीय गुंतवणूकदारांनीही मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेतले. अशा परिस्थितीत देशांतर्गत गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारावर विश्वास ठेवला आणि आपली गुंतवणूक वाढवली. याचा परिणाम असा झाला की, असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड (AMFI) ने डिसेंबर 2024 साठी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, या महिन्यात SIP द्वारे म्युच्युअल फंडातील गुंतवणूक 26000 कोटी रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचली आहे. 

मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप फंडांमध्ये बंपर गुंतवणूक
AMFI ने डिसेंबर महिन्यासाठी जारी केलेल्या म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीच्या आकडेवारीनुसार, मिड-कॅप म्युच्युअल फंड योजनांमध्ये सर्वाधिक 5093 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे, तर लार्ज कॅप्समधील गुंतवणूक 2010 कोटींवर पोहोचली आहे. याशिवाय, स्मॉल कॅप म्युच्युअल फंडांमध्ये 4667 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)

Web Title: Mutual Fund Investment at All-Time High, ₹ 26459 Crore Investment in December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.